Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

एंटरटेनमेंटची राणी राखी सावंतने मराठी बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री घेत सर्व स्पर्धकांची झोप उडवली आहे. राखी म्हणजे खरंच त्सुनामी आहे आणि आता ती घरात सर्वांनाच फैलावर घेणार यात शंका नाही.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 08, 2026 | 10:46 PM
आली Entertainment ची लहर,BIGG BOSS मराठीच्या घरात पसरणार राखीचा कहर!!!

आली Entertainment ची लहर,BIGG BOSS मराठीच्या घरात पसरणार राखीचा कहर!!!

Follow Us
Close
Follow Us:
  • राखी सावंतची मराठी बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री
  • स्पर्धकांच्या तोंडचे पाणी पळणार 
  • पुन्हा एकदा बिग बॉस गाजवायला राखी सज्ज 
“ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच, हो तीच, जिचा तुम्ही विचार करताय. आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर. हे काही फक्त शब्द नाहीत तर आता प्रेक्षकांना हे सर्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. कारण बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एंट्री होणार आहे. राखी सावंत घरात पूर्ण एंटरटेन्मेंटची त्सुनामी घेऊन येणार आहे! 

आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि समज-अपसमज… सगळ्यावर राखीचा एकच प्रश्नचिन्ह! तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. तेव्हा महाराष्ट्राला एन्टरटेन्मेंटचा भारी डोस मिळणार आहे. 

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

काय म्हणाली राखी 

राखी सावंत यावर बोलताना म्हणाली, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हांला माझे वेगवेगळे costumes, माझा गेम पहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खूप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे.”

राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप!

राखीला पाहून स्पर्धकांचे धाबे दणाणणार!

राखी ही अशी स्पर्धक आहे जिला हिंदीपासून मराठीपर्यंत सर्वच स्पर्धक घाबरून असतात. राखी म्हणजे निखळ मनोरंजन! राखीशिवाय बिग बॉस म्हणजे जणूकाही पाण्याविना मासा. ही उपमा नक्कीच अतिशयोक्ती नाही. जोपर्यंत राखी नाही तोपर्यंत बिग बॉसच्या खेळालाही मजा नाही आणि आता पुन्हा एकदा राखी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार झाली आहे. आता खेळाला अजून मजा येईल यात काहीच शंका नाही. गेल्या काही दिवसांपासून राखी घरात जाणार अशीच चर्चा रंगली होती आणि अखेर आता तो क्षण आलाय. रोज रात्री आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे यात तिळमात्र शंका नाही. 

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Web Title: First wild card entry in bigg boss marathi season 6 rakhi sawant ready to roast contestants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:46 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

‘Bigg Boss Marathi Season 6’ चा ग्रँड फिनाले ठरला 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!
1

‘Bigg Boss Marathi Season 6’ चा ग्रँड फिनाले ठरला 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली “मी इस्लाम सोडलेला…”, मौलानाशी करायचंय लग्न
2

Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली “मी इस्लाम सोडलेला…”, मौलानाशी करायचंय लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.