
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर आजपासू सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहे.
रितेश भाऊंच्या या खेळात कोण कोण राडा घालायला सज्ज आहे. हे आता काही तासांतच समजणार आहे.नवे पर्व, नवा खेळ आणि नवे चेहरे… बिग बॉस मराठी सीझन आजपासून रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच हा शो जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे.
याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच कलर्स मराठीने ‘बिग बॉस’चे काही प्रोमो शेअर केले आहेत ज्यामध्ये स्पर्धकांची झलक चाहत्यांना दिसली आहे. ही पोस्ट पाहून इंटरनेटचा पारा चढवला आहे. आणि सगळे ‘बिग बॉस’ प्रेमी पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत.ग्रँड प्रीमियरपूर्वी प्रदर्शित झालेल्या सहभागींच्या अनरिव्हील प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. कुणी सौंदर्य आणि अदा घेऊन येणारं फूलनदेवी रूप, कुणी कातिल डान्स मूव्ह्जने घायाळ करणारी अदा, तर कुणी घरात धुमाकूळ घालणारी दमदार एन्ट्री या झलकांमधून अनेक नावांवर चर्चा रंगू लागली आहे.कोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार हे थोड्याच वेळात समजणार