
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस 19’ हा रिॲलिटी शो कलर्स टीव्हीवर सुरु आहे. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बिग बॉसचा हा धमाकेदार सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आणि हा शो चाहत्यांचा नोरोप घेणार आहे. दरम्यान कलर्स मराठीवर शेअर करण्यात आलेल्या एका नवीन प्रोमोने चाहत्यांना उत्साहित केले आहे. ‘बिग बॉस 19’ हा हिंदी शो संपल्यानंतर लगेचच बिग बॉस मराठीचा ६ वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
BIGG BOSS 19: मालती चहरने तान्या मित्तलला मारली कानशिलात, नॉमिनेशन टास्क दरम्यान उडाला गोंधळ
‘काहीतरी धमाकेदार येतंय’ या शीर्षकासह कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा चाहत्यांचा उत्साह वाढवणारा प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोखाली चाहत्यांनी कमेंट करत बिग बॉस मराठीचा ६ वा सीजन सुरू होणार असल्याचा अंदाज लावून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच चाहते आता बिग बॉस मराठीचा ६ वा सीजन कधी सुरु होईल? कोणते स्पर्धक यामध्ये सहभागी होतील? यासगळ्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
बिग बॉस मराठी होणार सुरु?
बिग बॉस मराठीचे आत्तापर्यंत पाच सीजन यशस्वी पार पडले आहेत. पाचव्या सीजनचे धमाकेदार होस्टिंग मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसला. ज्या सीजनमध्ये सुरज चव्हाण विजेता ठरला होता. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच त्यामुळे कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी बिग बॉस सुरू होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण अद्याप यावर अधिकृत पुष्टी झालेली असून, चाहते आपला अंदाज लावत आहेत. त्यामुळे खरंच बिग बॉस मराठी सुरू होणार की दुसराच कुठला शो येणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठाचे ठरणार आहे. उद्या संध्याकाळी धमाकेदार नक्की काय येणार? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
कसे होते बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व ?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. फिनालेपर्यंत सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण उभे राहिले होते. यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. आणि तो त्याच्या नावावर ही मोठी ट्रॉफी करून गेला. आता बिग बॉस ६ कधी सुरू होतोय? यावर्षीही रितेश देशमुखच होस्ट करणार का? कोणत्या कोणत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पाहण्याची संधी मिळेल हे जाणून घेणे बाकी आहे.