
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अंकिता वालावलकर : इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध रील स्टार अंकिता प्रभू वालावलकर ही बिग बॉस मराठी सिझन ५ च्या घरामधून बाहेर पडली होती. बिग बॉसच्या या शर्यतीमध्ये ती पाचव्या क्रमांकावर राहिली. तिला बिग बॉसच्या घरामध्ये मोठी पसंत मिळाली आणि तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही दिले आहे. बिग बॉस मराठीचा हा सिझन ७० दिवस चालला. यावेळी तिने बऱ्याचदा तिच्या बाहेरच्या नात्यांबद्दल सांगितले. यावेळी तिने तिच्या पार्टनर बद्दल देखील बऱ्याचदा ती उघडपणे बोलली होती. फॅमिली राउंडमध्ये तिची इच्छा देखील होती की तिचा पार्टनर हा बिग बॉसच्या घरामध्ये यावा आणि तिने जगासमोर त्याला दाखवावे. परंतु त्यावेळी ते असे घडू शकले नाही. आता बाहेर आल्यानंतर तिने एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, ती लवकरच तिच्या पार्टनरसोबत फोटो शेअर करणार आहे.
आता बिग बॉस फेम अंकिता वालावलकरने एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो तिने तिच्या पार्टनरसोबत शेअर केला आहे. फोटो शेअर करून तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सूर जुळले……
बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर लवकर लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता तिने तिच्या पार्टनरसोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर केला आहे पण शेअर केलेल्या फोटोमधील अंकिता नवरा कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. शेअर केलेल्या फोटोमधील अंकिताचा पार्टनर या संगीत क्षेत्रामधील आहे अशी माहिती मीडियाने दिली आहे. त्याचे नाव कुणाल भगत असे आहे, तो एक संगीत दिग्दर्शक आहे. त्याचबरोबर कुणालने अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांसह, गाणी आणि चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे असे अनेक वृत्तांमध्ये सांगितले जात आहे.