(फोटो सौजन्य-Social Media)
‘बिग बॉस’ मराठी सिझन ५ जेव्हा पासून सुरु झाला आहे, तेव्हा पासून प्रेक्षक या शोचे चाहते झाले आहेत. या शो मधील प्रत्येक स्पर्धकांवर चाहत्यांनी प्रचंड प्रेम केले आहे. तसेच आता हा शो फेनालेला आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. बिग बॉस मराठीमध्ये शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मोठे धक्के पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉसच्या घराबाहेर पडले. आणि या गोष्टीचे चाहत्यांना खूप वाईट वाढले. तसेच आता बिग बॉसच्या घरात मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. जाणारे सदस्य टॉप २ मध्ये असेल, असे देखील म्हंटले जात आहे. हा स्पर्धक बाहेर पडल्याचं सोशल मीडियावर सांगितले जात आहे.
सध्या वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार हे बिग बॉसच्या घरात आहे. पण आता आठवड्याच्या मध्येच एक सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे. पण हा सदस्य कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. पण आता अंकिता वालावलकर या खेळातून बाहेर पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या बातम्या ऐकून चाहत्यांना खर्च धक्का बसला आहे.
अंकिता बाहेर पडली, खूप वाईट झालं…अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी अंकिता बाहेर पडल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता आजच्या भागात नेमकं कोण बाहेर पडणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून अंकिताला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत होता. मात्र आता या चर्चा खऱ्या ठरल्या तर चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. अंकिता बिग बॉसच्या घरात खूप छान गेमी खेळताना दिसले आहे. तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच ती खरंच घरा बाहेर आली तर चाहत्यांची निराशा होणार आहे.
हे देखील वाचा- TMKOC च्या दया बेनने ‘बिग बॉस 18’ला फटकारले, अभिनेत्रीने 65 कोटींची नाकारली ऑफर!
बिग बॉस घरात आलेली अंकिता वालावलकर आहे तरी कोण?
अंकिता प्रभू वालावलकर ही सोशल मीडियावरची स्टार आहे. अंकिता सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. गेल्या काही महिन्यात ती अनेक टीव्ही शोमध्येही तसंच विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहुणी म्हणून तर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, रमा राघव या मालिकेतील निखिल दामले सोबत अंकिताची एंट्री झाली होती. अंकिता आता प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली आहे.