Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…

दिग्गज कलाकार, चमकता रेड कार्पेट आणि ७० वा हिंदी फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला आणि याच खास सोहळ्यात ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदम यांची २ स्वप्न देखील पूर्ण झाली.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2025 | 12:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक
  • अभिनेत्रीची कोणती दोन स्वप्ने झाली पूर्ण?
  • दिग्गज कलाकारांमध्ये चमकल्या छाया कदम

अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी जागतिक पातळीवर स्वतःची अनोखी ओळख संपादन करून बॉलीवूडमध्येही अभिनेत्रीच्या कामाच कौतुक कायम होताना दिसत आहे. सगळ्या भूमिकेमधील अभिनेत्रीचे पात्र लापता लेडीज़ मधली भूमिका भाव खाऊन गेली आणि याच भूमिकेसाठी छाया कदम यांना बॉलीवूडचा किंग शाहरुख खान कडून फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. अभिनेत्रीला या गोष्टीचा खूप मोठा आनंद झाला आणि तिने सगळ्याचे आभार मानले.

Diane Keaton Death: हॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री डायेन कीटनचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या बद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या की, “लापता लेडीज़ सारख्या हिंदी चित्रपटासाठी हा पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळणं ही भावना कमालीची आहे. जेव्हा मी पुरस्कार स्वीकारायला फिल्म फेअरच्या मंचावर गेले तेव्हा माझी एक नाही दोन मोठी स्वप्नं पूर्ण झाली. बॉलीवूडचे किंग खान शाहरुख खान सरांकडून एक कडकडीत मिठी मिळणं आणि दुसरं ब्लॅक लेडी घरी घेऊन जाणं.’ असे त्या म्हणाल्या.

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लापता लेडीज या चित्रपटाने मला अशी कहाणी सांगण्याची संधी दिली जी अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. दिग्दर्शिका किरण राव, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांनी माझ्या कामाला ज्या ऊबदारपणे स्वीकारलं त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हा फिल्मफेअर पुरस्कार फक्त माझा नाही तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी सीमारेषांच्या पलीकडे स्वप्न पाहायची हिंमत करते.” असे अभिनेत्रीने म्हटले.

Filmfare 2025: अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री;

शाहरुखने केलं किस?
जगभरात आपल्या नावाचा डंका असणारी मराठमोळी अभिनेत्री छाया कदमला शाहरुखने किस केलं आहे. छाया कदम यांना ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील मंजू या भूमिकेसाठी शाहरुख खानच्या हस्ते सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर फिल्मफेअरच्या मंचावर शाहरुख खान छाया कदमला प्रेमाने मिठी मारताना आणि किस करताना दिसला. शाहरुखने मिठी मारताच छाया कदम यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

जागतिक पातळीवर जाऊन सगळ्यांचा लाडक्या छाया ताईनी आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि येणाऱ्या काळात देखील अजून उत्तम कथा, चित्रपट भूमिका घेऊन त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title: Both dreams came true today actress chhaya kadam gets emotional after winning filmfare award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Bollywood
  • FilmFare
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Filmfare 2025: अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री;
1

Filmfare 2025: अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री;

Diane Keaton Death: हॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री डायेन कीटनचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Diane Keaton Death: हॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री डायेन कीटनचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण
3

‘नोटबंदीमुळे नुकसान झालं, म्हणून कंपनीने…’, ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो
4

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.