(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. परंतु आता ‘गौरीशंकर’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला “गौरीशंकर” हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Box Office Report: ‘डाकू महाराज’ ने ‘गेम चेंजर’ दिली टक्कर; रविवारी इतर चित्रपटांनी केली एवढीच कमाई!
मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मिति संस्थेअंतर्गत ‘गौरीशंकर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून विशाल प्रदीप संपत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हरेकृष्ण गौडा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायाचित्रण केले आहे. तर संकेत कोळंबेकर यांनी लिहिलेल्या गीतांना अमित जवळकर यांनी संकलन, प्रशांत निशांत यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या चित्रपटात हरेकृष्ण गौडा, दक्षिणा राठोड, काव्या (कविता) सूर्यवंशी वसानी, राहुल जगताप या नवोदित कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या कलाकारांचे पात्र लक्षवेधी असणार आहे.
Bigg Boss 18 मधून बाहेर पडताच चाहत पांडेने केले मोठे खुलासे, रजत दलालचं काळं सत्य केलं उघड
‘गौरीशंकर’ या चित्रपटातली कथा आहे गौरी आणि शंकर यांच्या प्रेमाची… दुर्दैवानं त्यांच्या प्रेमात एक संकट निर्माण होते. त्याच्यावर आलेल्या संकटाचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न या आशयसूत्रावर ‘गौरीशंकर’ हा चित्रपट बेतला आहे. नव्या दमाचे कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एक थरारक, रोमांचक मनोरंजक कथानक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘गौरीशंकर’ प्रदर्शित होण्याची रसिकप्रेक्षकांना अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. आता या चित्रपटाची कथा आणि पात्र मोठया पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे.