(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक मराठी नवोदित कलाकार या मराठी चित्रपटसृष्टीला भेटले आहेत. यामधील गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सगळ्यांनी चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामधील एक प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आता गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. त्याच्या अतरंगी अभिनयाने घरोघरी पोहोचलेल्या पृथ्वीक प्रतापने अचानक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रताप त्याचा प्रियसी सोबत ( प्राजक्ता वायकुळ ) लग्न बंधनात अडकला असून अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. अगदी मोजक्याच मित्र मंडळी आणि घरच्या सोबत हा लग्न सोहळा पार पडला असून पृथ्विकच्या या कृती मागे तेवढंच खास कारण देखील आहे. मोठ्या थाटामाटात हा सोहळा का केला नाही असं विचारल्या वर पृथ्विक म्हणाला “मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जवाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे अस आम्हाला वाटतं”.
अभिनेता पृथ्वी प्रतापने लग्न करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यासंदर्भात अभिनेत्याने स्वतः फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू केल्याची माहिती दिली आहे. आज पृथ्वीक प्रताप विवाहबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने लग्नाचे सुंदर फोटो शेअर करून कॅप्शन लिहिले आहे की, “२५-१०-२०२४…एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” असं सुंदर कॅप्शन पृथ्वीकने लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांना हा फोटो पाहून चांगलाच आनंद झाला आहे. पृथ्वीकच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनीही अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – ‘बोलण्यासाठी खूप काही आहे पण…’ अभिषेक बच्चनने आगामी चित्रपट ‘आय वॉन्ट टू टॉक’चे नवीन पोस्ट केली शेअर!
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे, अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अमृता खानविलकर, अक्षया नाईक, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीकने अनेक मराठी चित्रपटामध्ये तसेच नाटकांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनेत्याचे अनेक प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.