(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अभिषेकचे नाव निम्रत कौरशीही जोडले जात आहे. पण आता आपण त्याच्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार यांनी त्यांच्या नवीन चित्रपट आय वॉन्ट टू टॉकसाठी हातमिळवणी केली आहे. अभिषेक बच्चनने या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अभिषेक बच्चनच्या लूकने. शूजित सरकार हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्याचे चित्रपट भावनांनी भरलेले असतात.
अभिषेकने पोस्टर शेअर करत एक दमदार कॅप्शन लिहिले आहे
पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनने पोस्टरमध्ये लांब कोटसारखे काहीतरी परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्याचे पोट दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे हावभाव आहेत. त्याच्या पोटावर शस्त्रक्रियेची खूण आहे. पोस्टर शेअर करताना अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘सांगण्यासारखं खूप काही आहे पण पण चित्रपट सगळं सांगून जाईल… असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ 22 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे केले कौतुक
यानंतर चाहत्यांनी आणि मीडियाच्या लोकांनी अभिषेकच्या कच्च्या आणि अनफिल्टर फर्स्ट लूकवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. एकाने टिप्पणी केली, “फिल्टरशिवाय वास्तविक अभिनेता…लव यू सर.” दुसरा म्हणाला,”माझे तुमच्यावर लक्ष आहे” असे लिहून चाहत्यांनी या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पोस्टरचे कौतुक करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सोनाली बेंद्रे, झोया अख्तर आणि सिकंदर खेर यांचा देखील समावेश आहे. अनेक चाहत्यांनी असेही सांगितले की ते दिग्दर्शक-अभिनेताची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हे देखील वाचा – 1996 मध्ये गायले पहिलं गाणं, लाइव्ह इव्हेंटमध्ये झाले निधन, 26 वर्षे बॉलीवूडवर केले राज्य या गायकाचे गुगलने तयार केले डूडल!
आय वॉन्ट टू टॉक चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन याशिवाय पर्ल डे, अहिल्या बांबरू, जयंत कृपलानी, क्रिस्टिन गुडडार्ड आणि जॉनी लीव्हर यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा आणि थीम याबद्दल फारसे काही उघड झालेले नाही. अभिषेक बच्चन शेवटचा ‘घूमर’ या चित्रपटात दिसला होता.