(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ आणि चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ तसेच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे यशस्वी पार पडला आहे. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे.
विविध पुरस्कारांनी कलाकारांचा सन्मान
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि अभिनेत्री काजोल यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘नेटफ्लिक्स पेरेंट्स’ OTTच्या नव्या युगातील कुटुंबीयांची नवीन ओळख; याचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या
मुख्यमंत्र्यांनी कलाकारांचे केले कौतुक
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील हजेरी लागली, सर्व पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलाकरांना प्रदान करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात चित्रपट आणि संगीतातील योगदानाबद्दल कलाकारांचे कौतुक केले. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
याच कार्यक्रमात, युनेस्कोमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना जागतिक व्यासपीठावर भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार केल्याबद्दल २०२५ चा छत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्कार देण्यात आला. अलिकडेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्यातील १२ किल्ले, मराठा लष्करी भूदृश्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन
मुक्ता बर्वे यांच्या 360 अंश अभिनय क्षमतेचा, विशेषतः ‘चार चौघी’ मधील त्यांच्या मोनोलॉगचा, तसेच महेश मांजरेकर यांच्या दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. गझलकार भीमराव पांचाळे यांचा उल्लेख करताना श्री फडणवीस म्हणाले, “सुरेश भट आणि भीमराव पांचाळे यांची जोडी मराठी गझलांना अविस्मरणीय उंचीवर घेऊन गेली.” “शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक वारसा मिळविणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे,” असं ते म्हणाले. यावेळी 60 आणि 61 व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री ॲड उपस्थित होते. तसेच, आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे हे सगळे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार, कलारसिक, प्रेक्षक यांची मोठ्या संख्येने हजेरी लागली होती.