(फोटो सौजन्य-Social Media)
सोनी लिव्हवरील मराठी क्राइम ड्रामा ‘मानवत मर्डर्स’साठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिरीजमध्ये दिग्गज सीआयडी डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणारे आशुतोष गोवारीकर यांनी नुकतेच त्यांच्या वारसाला सन्मानित करण्यासाठी कुलकर्णी कुटुंबाला भेट दिली. त्यांच्यासोबत दिग्दर्शक आशिष बेंडे आणि लेखक गिरीश जोशी देखील होते. या तिघांनी २९ सप्टेंबर रोजी श्रीमती कुलकर्णी आणि त्यांची मुलगी अनिता भोगले यांच्यासह हर्षा भोगले यांची भेट घेतली आणि कुलकर्णी यांच्या जीवनाबाबत बहुमूल्य माहिती जाणून घेतली.
कुलकर्णी कुटुंबाला दिलेल्या भेटीबाबत गोवारीकर म्हणाले, ”कुलकर्णी कुटुंबाला दिलेली भेट संस्मरणीय होती. रमाकांतजींचा विनम्रपणा आणि कुटुंबाप्रती प्रेम, गुन्हेगारांप्रती त्यांची सभ्य वृत्ती आणि टीम लीडर म्हणून त्यांच्या गुणांबाबत ऐकताना मला पोलीस गणवेशातील या महान व्यक्तीबाबत सखोल माहिती मिळाली. त्यांच्याकडून नवीन प्रेरणा घेत मी त्यांच्या भूमिकेमध्ये सामावून गेलो. संपूर्ण ‘मानवत मर्डर्स’ टीमसाठी या सिरीजच्या माध्यमातून अधिकारीसोबत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला सन्मानित करणे महत्त्वाचे होते.” असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- रॉकस्टार डीएसपीच्या ‘ओओ अंतवा’ वर SRK आणि विकी कौशलचा आयफा स्टेजवर खास परॉर्मन्स!
स्टोरीटेलर्स नूक निर्मित आणि कुलकर्णी यांचे आत्मचरित्र ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित या सिरीजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यासारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रोमांचक अनुभव घेण्यास आणि नवा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी ‘मानवत मर्डर्स’ ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.