Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभमंगला सावधान! रेश्मा शिंदे करतेय ‘आयुष्याची नवी सुरुवात’; अखेर दिसला वरचा चेहरा लग्न सभारंभाचे फोटो व्हायरल!

मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे अखेर लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. चाहत्यांना हे फोटो पाहून खूप आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 29, 2024 | 01:04 PM
रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीने दिल्या खास पद्धतीत शुभेच्छा; म्हणाला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा...'

रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीने दिल्या खास पद्धतीत शुभेच्छा; म्हणाला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा...'

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. खूप दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या काळात अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तयारी देखील चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती. परंतु अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचा नाव आणि चेहरा समोर आला नव्हता. आता अखेर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री आता पवनसह लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पुण्यात अभिनेत्रीचा शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन यांचा पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा आणि वर पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ, केसात चंद्रकोरचा खूप आणि मोत्यांचे दागिने परिधान करत आकर्षित लुक तयार केला आहे. तर अभिनेत्री रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत नवऱ्या मुलाचा लूक खूप सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये दोघेही अप्रतिम दिसत आहे. या दोघांना पाहून चाहत्यांची नजर त्याच्याकडून हटतच नाही आहे.

 

14 गाणी, 18 गायकांचा आवाज, बहुचर्चित मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चे भव्य म्युझिक लाँच

अभिनेत्री रेश्माने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत.चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील तिला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. या शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नवरदेव पवनसह सप्तपदी घेताना दिसत आहे. याचदरम्यान कानपिळी विधीचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक चाहत्यांना दिसली. याचदरम्यान अभिनेत्री आणि तिचा नवरा पवन या दोघांचीही जोडी सुंदर दिसत आहे.

कामाच्या आघाडीवर, मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तसेच रेश्माने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण देखील केले आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. रेश्माने पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून पुण्यात कोथरुड येते स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे.

Web Title: Marathi television actress reshma shinde tie knot with pavan wedding photos goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 12:54 PM

Topics:  

  • reshma shinde

संबंधित बातम्या

आता निघणार काट्याने काटा; जानकी देणार ऐश्वर्याला जशास तसं उत्तर, “घरोघरी मातीच्या चुली” मालिकेतील मोठा ट्विस्ट
1

आता निघणार काट्याने काटा; जानकी देणार ऐश्वर्याला जशास तसं उत्तर, “घरोघरी मातीच्या चुली” मालिकेतील मोठा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.