
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“हम आपके हैं कौन” या लोकप्रिय आणि प्रसिद्ध चित्रपटामधील अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्रीने स्वतःच्या अभिनय कौशल्याने अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. अलिकडच्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने सुरुवातीच्या दिवसांबद्दल आपला प्रवास शेअर केला आहे, एका निर्मात्याने अभिनेत्रीला एक विचित्र प्रस्ताव केला होता, ज्यामुळे त्यांची आईही आश्चर्यचकित झाली होत्या. आता अभिनेत्री नक्की याबद्दल काय म्हणाली हे जाणून घेणार आहोत.
रेणुका शहाणे यांनी झूमशी बोलताना सांगितले की, एका प्रकल्पासाठी त्यांना साइन करण्याच्या बहाण्याने चित्रपट निर्मात्याने त्यांना घरी बोलावले होते. या घटनेची आठवण करून देताना अभिनेत्री म्हणाली, “एक निर्माता अनेक वर्षांपूर्वी माझ्या घरी येत होता. तो मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले होते. आणि त्यांनी मला एक प्रस्ताव दिला होता, की मी विवाहित आहे, पण तू माझ्यासोबत राहा. तू माझ्या ब्रँडची ॲम्बेसेडर हो. मी तुला दर महिन्याला स्टायपेंड देईन.”
रेणुका शहाणे यांना निर्मात्याने त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले
रेणुका पुढे म्हणाली, “त्यांचा साड्यांचा उद्योग होता, मी तुम्हाला दरमहा स्टायपेंड देईन आणि आम्ही एकत्र राहू… मी आणि माझी आई आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होतो. मला वाटते की त्यानंतर जे घडले ते जास्त महत्त्वाचे होते. हे ऐकून मी आणि माझी आई दोघीही थक्क झालो. त्या घटनेनंतर मी ते कॅम्पेन न करण्याचा निर्णय घेतला.”
रेणुका यांनी इंडस्ट्रीमध्ये छळ कसा होतो हे स्पष्ट केले
रेणुका यांनी अशा घटनांचा महिलांवर होणारा परिणाम स्पष्ट केला. रेणुका यांनी पुढे सांगितलं, “अशा परिस्थितीत कलाकारांकडे दोनच पर्याय असतात. गप्प राहायचं किंवा काम सोडून द्यायचं. जर तुम्ही विरोध केला तर तुम्हाला प्रोजेक्टमधून बाहेर काढलं जातं. बऱ्याचदा पैसे दिले जात नाहीत. उलट पीडितेलाच दोष दिला जातो. एक ग्रुप असतो जो अशा लोकांना प्रोटेक्शन देत असतो.”
renuka