(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रोहन परशुराम कनावडे दिग्दर्शित ‘साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)’ २०२५ सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्पर्धा करणारा भारतातील एकमेव चित्रपट ठरला आहे. प्रतिष्ठित फेस्टिवलमध्ये सामील होणारा पहिलाच मराठी भाषिक चित्रपट ठरत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. ‘साबर बोंडा’ सनडान्स फिल्म फेस्टिवलच्या वर्ल्ड सिनेमा ड्रामॅटिक कॉम्पीटिशनमध्ये स्पर्धा करणारा भारतासोबत दक्षिण आशियामधील एकमेव चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट यंदा फेस्टिवलसाठी मिळालेल्या जगभरातील हजारो सबमिशन्समधून निवडण्यात आलेल्या चित्रपटांसोबत स्पर्धा करणार आहे. ओळख, कौटुंबिक अपेक्षा आणि अतूट प्रेमाचा हा प्रेमळ, पण प्रबळ शोध जागतिक मंचावर भारतीय स्वतंत्र सिनेमाच्या नवीन लाटेच्या प्रभावी उदयाला सुरू ठेवत असलेल्या मराठी सिनेमासाठी मोठा क्षण आहे.
हा चित्रपट शहरात राहणाऱ्या आनंदच्या अवतीभोवती फिरतो, या चित्रपटामध्ये भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप असे प्रतिभावान कळकरांनी काम केले आहे. चित्रपटाचे कथानक आव्हानात्मक स्थितींमधील वैयक्तिक नात्यांच्या गुंतागूंतींना आणि एखाद्या सत्याचा आदर करण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याला सादर करते. या चित्रपटाला परीक्षकांची प्रशंसा देखील मिळाली आहे.
वेनिस बायनेल कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ आणि एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्पअंतर्गत विकसित करण्यात आलेला आणि फिल्म लंडन प्रॉडक्शन फायनान्स मार्केट, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प, फिल्म बझार को-प्रॉडक्शन मार्केट, वेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट आणि गोज टू केन्स अशा जागतिक प्लॅटफॉर्म्सवर सादर करण्यात आलेला चित्रपट ‘साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)’ आंतरराष्ट्रीय सहयोगात्मक प्रयत्नाच्या सर्वोत्तम टॅलेंट्सना दाखवतो. नीरज चुरी (यूके), मोहमद खाकी (कॅनडा), कौशिक राय (यूके), नरेन चंदावरकर (भारत), सिद्धार्थ मीर (भारत) व हरेश रेड्डीपल्ली (भारत), तसेच सह-निर्माता, प्रतिष्ठित अभिनेता जिम सर्भ आणि सहाय्यक निर्माता राजेश परवटकर यांच्याद्वारे निर्मित हा चित्रपट मराठी सिनेमासाठी मोठी उपलब्धी आहे.
Smita Patil: स्मिता पाटील अभिनेत्री बनण्याआधी होती पत्रकार, रस्त्यावर पडलेल्या फोटोने बनले नशीब!
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करत लेखक-दिग्दर्शक रोहन परशुराम कनावडे म्हणाले, ”’साबर बोंडा (कॅक्टस पिअस’) अत्यंत वैयक्तिक चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित गावामध्ये अनुभवलेल्या दु:खद काळाची आठवण करून देतो, ज्यादरम्यान माझ्यावर विवाहासह सांस्कृतिक अपेक्षांचे पालन करण्याचा मोठा दबाव होता. हा चित्रपट नुकसानआणि बंदिवासाच्या त्या क्षणाला मोहक रोमांसमध्ये रूपांतरित करतो, जो माझ्या अनुभवांना, तसेच माझ्या आईवडिलांच्या प्रेमाला साजरे करतो, ज्यांनी समजून घेत माझ्या लैंगिकतेचा स्वीकार केला. या वैयक्तिक कथानकाला प्रत्यक्षात आणणे आणि सनडान्समध्ये मान्यता मिळणे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यास आणि फेस्टिवलमधील मराठी सिनेमाच्या ऐतिहासिक उपस्थितीला साजरे करण्यास उत्सुक आहे.” असे ते म्हणाले आहेत.