Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Pilgaonkar: ‘मला कोणी काम देत नाही…’ लोकप्रिय अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली खंत!

सचिन पिळगांवकर हे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही लोकप्रिय व्यक्तीमत्व आहेत. पण आता त्यांनी कोणीच काम देत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच अभिनेता याबाबत काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2025 | 04:31 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा पासून त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. आजवर सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या आहेत. केवळ अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक निर्माता लेखक आणि गायक म्हणून सुद्धा ते लोकप्रिय आहेत. चाहत्यांना त्यांचा अभिनय आणि चित्रपट खूप आवडतात. मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी आपली छाप पाडली आहे. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि त्यात अभिनय सुद्धा केला. परंतु ते आता त्यांना हिंदी सिनेमासृष्टीत काम न मिळण्याची खंत व्यक्त करत असल्याचे समोर आले आहे.

Mrs Movie: सान्या मल्होत्राचा ‘मिसेस’ चित्रपट चर्चेत; Zee5 प्लॅटफॉर्मवर लाभला सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड!

अभिनेते सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी गोव्यातील पिलागाव येथील सारस्वत ब्राह्मण कुटुंबात मुंबईत झाला. त्यांचे वडील शरद पिळगावकर हे चित्रपट निर्माते होते आणि मुंबईत ते प्रिंटिंग व्यवसायही करत होते. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन यांनी आपल्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर केवळ मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेमासृष्टीतही खूप नाव कमावले आहे. ‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी त्यांना वयाच्या ५ व्या वर्षी देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यानंतर खूप सुपरहिट चित्रपट आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांचा अभिनय अजूनही चाहत्यांना तेवढाच आवडतो. आणि तो पाहताना त्यांना कंटाळा येत नाही. तसेच काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमात दिसले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. आणि या चित्रपटात त्यांनी बऱ्याच काळाने त्यांनी मोठ्या पडद्यावर काम केले. इतकी वर्ष मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये ते का दिसले नाहीत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीद्वारे दिली आहे.

‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ मालिकेची चर्चा; ‘स्टार प्लस’ घेऊन येत आहे जादुई दुनियेचे गूढ रहस्य!

‘देवाचे घर’ या सिनेमाच्या प्रीमियरला लोकमत फिल्मीला, दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले होते की, ‘मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी माझ्याकडे सध्या कोणतेही काम नाही. आणि मला कोणी कामही देत नाही. आमच्या सिनेमात काम करा असे म्हणायला माझ्याकडे कोणी येतही नाही. ते का येत नाही हे मला माहित नाही त्यांना कदाचित वाटत असेल की मी अभिनय सोडला आहे पण ती त्यांची चुकीची समजूत आहे.’ असे ते म्हणाले आहेत. सचिन पिळगावकर यांनी प्रत्येक वेळी पडद्यावर उत्तम कलाकृती सादर केली आहे. पण आज एवढ्या मोठ्या कलाकाराला कामाची संधी मिळत नाही हे थोड्या आश्चर्यकारक आहे. आणि याबाबत त्यांना बोलताना पाहून चाहते देखील थोडे चकित झाले आहेत.

Web Title: Sachin pilgaonkar says that despite working in the film industry for many years no one offers him a role in a film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • marathi cinema
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज
1

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
2

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
3

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
4

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.