Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डिटेक्टिव धनंजय’ या आगामी वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न! आदिनाथ कोठारे दिसणार खास भूमिकेत

मराठी अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्याच्या 'डिटेक्टिव धनंजय' या आगामी वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 10, 2025 | 11:30 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न
  • आदिनाथ कोठारे दिसणार खास भूमिकेत
  • अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसणार अभिनेता

बॉलीवूडमध्ये बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होत असताना सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे हा चर्चेत आहे. एकीकडे निर्मिती संस्था असलेल्या कोठारे व्हिजनची ” नशीबवान ” ही मालिका आणि आता पुन्हा सुरू होणार आहे. अभिनेता या नवीन कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आदिनाथने एक खास गिफ्ट प्रेक्षकांना देऊन नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे देखील प्रेक्षकांना समजले आहे आणि त्याचा प्रोमो देखील समोर आला होता. या बहुचर्चित वेब सीरिजचा मुहूर्त नुकताच संपन्न झाल्याचं त्याने सोशल मीडिया वर सांगितले आहे.

झी 5 मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या डिटेक्टिव धनंजय मध्ये तो एका डिटेक्टिवच्या भूमिकेत बघायला मिळणार असून सोबतीला आदिनाथ या नव्या वेब सीरिजसाठी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबईत “डिटेक्टिव धनंजय ” या वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न झाला आहे. आणि वेब सीरिजच्या शूटला सुरुवात झाली आहे. झी 5 वर ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजले आहे.

Box Office Collection: रविवारी ‘हक’ चित्रपटाला बसला मोठा झटका तर, सोनाक्षी सिन्हाचा ‘जटाधारा’ फ्लॉपच्या मार्गावर

मराठी इंडस्ट्री मधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन “डिटेक्टिव धनंजय’ या वेब सीरिजची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. गिरीश जोशी यांनी या सिरीज साठी स्क्रीनप्ले लिहिला असून. श्रीरंग गोडबोले निर्मितीसोबतच दिग्दर्शन करणार आहेत.

डिटेक्टिव धनंजय या वेब सीरिज बद्दल पहिल्यांदा व्यक्त होताना आदिनाथ म्हणाला की, “प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याकडे माझा कल असतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मला कायम नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भाग पाडत. डिटेक्टिव धनंजय मधून देखील काहीतरी खास घेऊन येणार आहोत हे नक्की! कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेब शो मधून उलगडणार असून निर्माता आणि अभिनय या दोन्ही भूमिका यासाठी करणार आहे आणि मला याची फार उत्सुकता आहे. ओटीटी विश्वात काहीतरी वेगळं हटके घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहेत.” असे अभिनेता म्हणाला आहे.

‘मी विवाहित, पण तू माझ्यासोबत राहा…’ चित्रपट निर्मात्याची रेणुका शहाणेंकडे विचित्र मागणी, अभिनेत्रीची आईही शॉक

एकीकडे अभिनेता म्हणून सुरू असलेला आदिनाथचा प्रवास तर दुहेरी भूमिका बजावत कायम उत्तम कलाकृतीची निर्मिती करून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स देतो आहे. येणाऱ्या काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलीवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे. तसेच अभिनेत्याच्या या नव्या भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Shooting of actor adinath kothares upcoming web series detective dhananjay begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Entertainmnet
  • marathi actor
  • Web Series

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप! गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळवले स्थान
1

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप! गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळवले स्थान

New Marathi Movie :जिद्द, सेवा आणि संघर्षाची कथा सांगणारा ‘ताठ कणा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

New Marathi Movie :जिद्द, सेवा आणि संघर्षाची कथा सांगणारा ‘ताठ कणा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण
3

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड
4

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.