
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटाने असल्याचे दिसत आहे. कारण या वर्षात अतिशय सुंदर आणि आशयघन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तसेच अनेक मराठी चित्रपटांनी प्रशंसा देखील मिळवली आहे. अशातच आता आणखी एका साऊथ अभिनेत्याला मराठी चित्रपटाची भुरळ चढली आहे. आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून, धनुष आहे. होय, अभिनेत्याने स्वतः या चित्रपटाची पोस्ट शेअर करून एक सुंदर नोट देखील लिहिली आहे.
महाराष्ट्रात दीर्घकाळ चालत आलेल्या या परंपरेच्या अवतीभोवती फिरणारी गोष्ट आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे पद्मविभूषण इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट असून नुकतंच या सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .’चांदणं’ असे या गाण्याचे नाव असून, या गाण्याची क्रेझ चाहत्यांना लागली आहे. आणि आता याचेच कौतुक करणारी पोस्ट साऊथस्टारने टाकली आहे. काही दिवसांपूर्वी ‘गोंधळ’मधील ‘चांदणं’ हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आणि या गाण्याची जादू प्रेक्षकांवर आणि चक्क सुपरस्टार धनुषवरही झाली.
इलैयाराजा यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला दिले संगीत
इलैयाराजा यांनी पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यांची संगीत रचना आणि माधुर्य ‘चांदणं’ गाण्यात अनुभवायला मिळत आहे. धनुष आणि इलैयाराजा यांचे एक खास नाते आहे. या दोघांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांसाठी एकत्र काम केले आहे आणि धनुषने इलैयाराजांच्या गाण्यांना आपला आवाजही दिला आहे. त्यांचे हे गाणं प्रेक्षकांनाही भुरळ घालत आहे.
Chandan from the marathi film Gondhal is a true gem from our very own maestro @ilaiyaraaja sir 🙏 you never cease to amaze us RAJA sir .. GRATEFUL 🙏🙏😇😇https://t.co/eXlTKysIgx — Dhanush (@dhanushkraja) November 8, 2025
‘चांदणं’ गाण्याची लिंक शेअर करत धनुषने ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर एक खास पोस्ट लिहिली. धनुष म्हणाला, “‘गोंधळ’ या मराठी चित्रपटातील ‘चांदणं’ हे गाणं हे आपले उस्ताद @ilaiyaraaja सर यांनी तयार केलेलं एक खरं रत्न आहे. तुम्ही आम्हाला आश्चर्यचकित करण्याचे थांबवत नाही राजा सर.. कृतज्ञ.”, स्वतः साऊथच्या सुपरस्टारने केलेल्या या कौतुकामुळे ‘गोंधळ’ चित्रपटाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला मोठी दाद मिळाली आहे.
दिलजीत दोसांझवर ‘खलिस्तान झिंदाबाद’ नारा प्रकरणानंतर पुन्हा धमकी; अभिनेत्याच्या वाढल्या अडचणी
गायक आणि कलाकारांची फौज
‘चांदणं’ या रोमँटिक गाण्याला अजय गोगावले, आर्या आंबेकर आणि अभिजीत कोसंबी यांसारख्या प्रतिभावान गायकांनी आवाज दिला आहे. हे गाणे योगेश सोहोनी आणि इशिता देशमुख या जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले झाले ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यात इलैयाराजा अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हे क्षण संगीतप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहेत.
संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.