(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर अभिनीत ‘दशावतार’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने २०२५ हे वर्ष गाजवले आहे. दशावतार हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक सिनेमा बनला आहे. कांतारा सारखा सिनेमा समोर असतानाही दशावतारने आपली पकड घट्ट ठेवली होती हा चित्रपट कुठेही डगमगला नाही. चित्रपट रिलीज झाल्यावर त्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाचे आणखी शो वाढवण्यात आले. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि अमराठी प्रेक्षकांकडूनही चित्रपटाची प्रशंसा मिळाली.
कोकणातील बंद पडलेल्या अनेक चित्रपट गृहांची दारे ‘दशावतार’ या चित्रपटाने पुन्हा उघडली. अमेरिकेत शंभरहून जास्त शो या चित्रपटाचे दाखवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशही येथे ‘दशावतार’ने आपला झेंडा फडकवला आहे. दशावतार या सिनेमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळातही सिनेमाची खूप प्रशंसा झाली. चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसचं नाही तर लोकांच्या मनावरही राज्य केले.
Bigg Boss 19 : फरहाना भट्टच्या टीमच्या निशाण्यावर सलमान खान! सोशल मिडियावर केलेली पोस्ट व्हायरल
मराठी चित्रपट इंडस्ट्रीला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने पूर्ण केलं आहे. इतकंच नाही तर दशावतारी कलाप्रकाराचा आधार या सिनेमात घेतल्याने ती लोककला आणि दशावतारी कलाकारांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. ‘दशावतार’ या सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही तर कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना आपली संस्कृती आणि परंपरेची पुन्हा जाणीव करून दिली.
या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दशावतार हा सिनेमा आता या आठवड्यात म्हणजेच 14 नोव्हेंबरला Z5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आता घर बसल्या बघायला मिळणार आहे.
ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
दशावतार चित्रपटाचे बजेट ४ कोटी इतके होते. परंतु चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच बजेट वसूल करून आपली पकड मिळवली. चित्रपटाने भारतात २३ कोटींहून अधिक कमाई केली तर सिनेमाचं वर्ल्ड वाईल्ड कलेक्शन हे २८ कोटींहून अधिक आहे. तसेच हा २०२५ मधील जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.






