
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’चे नवीन सीझन ६ सुरू होताच घरामध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. नॉमिनेशन टास्क दरम्यान तन्वी आणि सागर कारंडे यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आणि त्यामुळे तन्वी ढसाढसा रडली असावी अशी शंका नाकारता येत नाही. याच वादाच्या वातावरणात घरात एक अतिशय भावनिक क्षण पाहायला मिळाला. मागील काही भागांपासून तन्वी आणि सागर यांच्यात काही कारणावरून खटके उडताना दिसत होते. मात्र, प्रोमोमध्ये असे दिसते की, तन्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तन्वी इतकी भावूक झाली होती की तिला रडू आवरणे कठीण झाले होते. सदस्यांनी तन्वीला सावरले.
तन्वीला अशा प्रकारे रडताना पाहून घरातील इतर सदस्यांनी त्यांचे मतभेद विसरून तिच्याकडे धाव घेतली.सगळे जण तिला शांत आणि सांत्वन करताना दिसत आहेत.यावेळी राकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तिला तो म्हणतो, आज रडायचे नाही,चांगला दिवस आहे. तो यावेळी तिला पाणी आणून देण्यासाठी सांगतो. सागर कारंडे बाहेर बसलेला असतो त्यावेळी तो म्हणतो, बिचारी… मला वाईट वाटतं आहे तिचं… खरंच ती हे सगळं इतरांना सांगते ना, एकदा मला येऊन बोली असती ना पूर्ण हलकं केलं असतं मी तिला… ”
नॉमिनेशन प्रक्रिया: ९ स्पर्धक रडारवर
नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील ९ सदस्यांवर इविक्शनची टांगती तलवार आली आहे. या प्रक्रियेत स्पर्धकांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत एकमेकांना नॉमिनेट केले. नॉमिनेटेड सदस्य यांमध्ये कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे लवकरच समजणार आहे. तसेच आता या ‘बिग बॉस मराठी ६’ सीझन काय धमाका करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
‘बीबी फार्म’ (BB Farm) टास्क: घराचे झाले रणांगण!
पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी ‘बीबी फार्म’ हा टास्क पार पडणार आहे ज्यात समर्थकांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार आहे. शेतातील कापूस आणि इतर मालमत्ता जमा करण्याच्या या खेळात स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. धक्काबुक्की आणि वाद: प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, विशाल आणि ओमकार यांच्यात शारीरिक झटापट झालेचे दिसले आहे. रोशनने रागाच्या भरात आक्रमक पवित्रा घेतल्याने घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी केली.