(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर मागचे काही दिवस मंदार देवस्थळी प्रकरणामुळे चर्चेत आहे. शशांक नेहमीच सामाजिक विषयांवर आपले मत मांडताना दिसत असतो. आता अशातच सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ आता सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान आज मतदानाच्या दिवशी देखील शशांक केतकरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शशांकबरोबरच अनेकांनी संपात व्यक्त केला आहे
.
महापालिका निवडणुकींसाठी आज सर्वत्र मतदान होताना दिसत आहे. या मतदानांसाठी प्रामुख्यानं शाळांची निवड केली जाते. स्थानिक शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडतात. शशांक देखील अशाच एका स्थानिक शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला होता. पण तिथे गेल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून तो संतापला. शशांक ठाण्यातील ज्या शाळेत मतदान करायला गेला होता त्या शाळेच्या बाहेर कचऱ्याचा ढीग पडलेला दिसला. हा कचरा पाहून शशांकनं व्हिडीओ शेअर केले आणि लोकांचे डोळे पुन्हा उघड केले. ज्या शाळेत मतदान केलंय त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे असं म्हणत शशांकने व्हिडीओ शेअर केला आहे.
कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! तब्बल १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन
शशांकने त्याच्या पोस्टमध्ये कॅप्शन मध्ये लिहिले, “ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या exact बाहेर ही अवस्था आहे . उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी ‘स्वच्छता’ या basic गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरीक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे.”
“ही माझ्या मनातली उदासीनता नाहीये … वस्तुस्थिती आहे . INTERNATIONAL SCHOOL आहे ही ठाण्यातली त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे. #हे_चालणार_नाही.” फक्त व्हिडीओ शेअर केला नाही तर शशांकने ठाण्यातील सगळ्या राजकीय नेत्यांना हा व्हिडीओ टॅग देखील केला आहे.
‘बीबी फार्म’ टास्कमध्ये सुरु झाला राडा, पहिल्या आठवड्यात ‘Bigg Boss’ चे धक्कादायक नॉमिनेशन
शशांक केतकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नागरिकांनी त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. काहींनी ठाणे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आज सकाळीच अनेक कलाकार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मतदानाचा हक्क बजावून ते त्यांच्या पुढच्या कामाला देखील निघाले आहेत. तसेच अनेक कलाकार सोशल मीडियावर चाहत्यांना मतदान नक्की करा याचा सल्ला देत आहेत.






