Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात रंगणार संगीतभूषण पं.राम मराठे स्मृती संगीत समारोह, रसिकांसाठी कथ्थक, गायन आणि वादनाची मेजवानी…

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 3० वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस हा महोत्सव असणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 06:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ५ डिसेंबर ते ७डिसेंबर या दरम्यान ३० वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे, सायंकाळी ७ वाजता महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले.

महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पं. मुकुंद मराठे, पं. मुकुंद देव, पं. विवेक सोनार, तबलावादक रवी नवले उपस्थित होते. शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री. राजेंद्र गांगाणी यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आहे. रात्री. ८ वाजता गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यांना तबल्यावर रोहित देव, तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर साथसंगत करणार आहे. तर रात्री ९.४५ वाजता उस्ताद शाहीद परवेझ यांचा सितारवादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी साथसंगत करणार आहेत.

तर, रविवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वैशाली पोतदार यांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी ११ वाजता सावनी पारेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर अथर्व आठल्ये तर हार्मोनियमवर अमेय गांधी साथसंगत करणार आहे. आशा खाडीलकर यांना मानाचा पुरस्कार आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गावनप्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या व आपल्या आवाजातील माधुर्य, श्रुतीसाधना, स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणा-या आशा खाडीलकर यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये ५१,००० रुपये सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

१०० जन्म मिळाले तरी, एक्टर म्हणून…,चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण, काय म्हणाले रजनीकांत?

कथ्थक या अभिजात भारतीय नृत्यप्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये २५,००० रुपये सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री ८ वाजता होणार आहे. तदनंतर रात्री ८.३० वाजता पं. सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास वितळे व हार्मोनियमवर नीला सोहोनी साथसंगत करणार आहेत.

दीपिका पादुकोण होणार सनी देओलची नातेवाईक, बहिणीचं लग्न ठरलं, जाणून घ्या अनिशाचा जोडीदार कोण?

कार्यक्रम सर्व रसिकासाठी विनामूल्य असून याकार्यक्रमाच्या प्रवेशिका राम गणेश गडकरी रंगायतन, नाट्यगृहावर उपलब्ध होणार आहेत, तीन दिवस तुरू असणा-या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांमधून प्रत्येक दिवशी एक भाग्यवान (लकी ड्रॉ) रसिक निवडला जाणार असून त्या रसिकास भेटवस्तू दिली जाणार आहे. तरी ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Thane municipal corporation is organizing the 30th sangeet bhushan pt ram marathe memorial festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
1

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”
2

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा
3

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?
4

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.