Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजातव ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रदर्शित!

शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटातील शीर्षक गीत अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात प्रदर्शित केले जाणार आहे. ‘आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या १ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2025 | 02:03 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय’ हा नवा मराठी चित्रपट १ मे पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महिलादिनी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता ह्याच सिनेमाचं मनाला भिडणारं शीर्षक गीत ‘आता थांबायचं नाय’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये जीवनाच्या नवीन प्रवासाचा, उंच भरारी घेण्याचा, नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला ध्यासाचा आनंद व्यक्त केला आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम कलाकार ह्या एका गाण्यात दिसत आहेत .

World Theatre Day 2025: जागतिक रंगभूमी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व!

‘आता थांबायचं नाय’ हे गाणं मनामनावर प्रभाव पडणारे असून या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे, या गाण्यात त्यांचा आवाज अतिशय आल्हाददायक वाटतो तर गायिका आनंदी जोशी हिने सुद्धा आपल्या सुरांनी या गाण्याला साज चढवला आहे. या सिनेमासाठी नव्या दमाचे संगीतकार गुलराज सिंग यांनी सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत तर मनोज यादव हे गीतकार आहेत. प्रेरणादायक आणि सकारात्मक ऊर्जा देणारं हे गाणं प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी आहे. हे गाणं पाहून तुम्ही नक्कीच ‘आता थांबायचं नाय’ गुणगुणणार हे नक्कीच.

 

गायक अजय गोगावले यांनी या गाण्याबद्दल मन व्यक्त करताना म्हणाले, “संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा देणं आणि सकारात्मक विचार देणं हे खूप महत्त्वाचे आहे, आता थांबायचं नाय हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे, गाणं गाण्यापूर्वी त्यामागची गोष्ट समजून घेण्यावर मी भर देतो. त्यामुळे हे माझं भाग्य आहे कि अशा प्रेरणादायी संदेश देणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे”. असे ते म्हणाले आहेत. गायक अजय गोगावले यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता या गाण्याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

April May 99: उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणी होणार ताज्या; ‘एप्रिल मे ९९’ मध्ये दिसणार ‘हे’ चेहरे!

शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्रवीण डाळिंबकर,रूपा बोरगांवकर त्याच बरोबर रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया हे सिनेमाचे निर्माते आहेत. झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. हा सिनेमा महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The title song of the film ata thambaycha naay is released in the melodious voices of ajay gogavale and anandi joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • marathi cinema
  • sidharth jadhav

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

तर ‘ही’ अभिनेत्री आहे गश्मीरची क्रश! स्वतः अभिनेत्याने केला खुलासा… नाव जाणून घ्याच!
2

तर ‘ही’ अभिनेत्री आहे गश्मीरची क्रश! स्वतः अभिनेत्याने केला खुलासा… नाव जाणून घ्याच!

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
3

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
4

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.