• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • These Actors Will Be Seen In Rohan Mapuskar Marathi Film April May 99

April May 99: उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणी होणार ताज्या; ‘एप्रिल मे ९९’ मध्ये दिसणार ‘हे’ चेहरे!

मराठी चित्रपट ‘एप्रिल मे ९९’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. या चित्रपटामधील स्टारकास्टची नावं आता समोर आली आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2025 | 01:48 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे. त्यामुळे याबद्दलची उत्सुकता अजूनही ताणलेलीच आहे. दरम्यान या चित्रपटात आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या तिघांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Ram Charan Bday:अभिनयातच नाही तर व्यावसायिक जगातही चमकणारा तारा आहे राम चरण, जाणून घ्या एकूण संपत्ती!

आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर या तिघांनी याआधीही काही चित्रपटांत, मालिकांमध्ये काम केले आहे. आर्यन मेंगजी याने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, बरोट हाऊस’, ‘डायबुक’, ‘बाबा’, ‘१५ ऑगस्ट’, ‘बालभारती’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आर्यनला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बालभारती’ चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. श्रेयस थोरात याने कलर्स मराठीवरील ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत मोरूची भूमिका साकारली असून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. तर मंथन काणेकर याने ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘योगयोगेश्वर जय शंकर’, आणि ‘गाथा नवनाथांची’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण केली आहे. आता हे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश हे तिघेही मोठ्या पडत्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर या चित्रपटाबाबत म्हणाले की, “एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी योग्य कलाकार निवडणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. अनेक मुलांच्या ऑडिशन्स घेतल्यानंतर आम्ही आर्यन, श्रेयस आणि मंथन यांची या चित्रपटासाठी निवड केली. आर्यनची माधुरी दीक्षित यांच्या ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटासाठी मीच निवड केली होती. तर रोहित शेट्टी यांची निर्मिती असणाऱ्या ‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या चित्रपटासाठी श्रेयसची निवड केली होती. त्यामुळे हे दोघे माझ्या परिचयाचे होते. असे असले तरीही आमच्या टीमने ॲाडिशन घेऊन ते या भूमिकेत चपखल बसतात का, याचा विचार करूनच त्यांची निवड केली. सिद्धेशच्या भूमिकेसाठीही आम्ही बरेच पर्याय बघितले होते. परंतु त्याचे आणि त्याच्या वडिलांचे कास्टिंग मॅच करण्यासाठी आम्ही मंथनची निवड केली. हे तिघेही या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत. श्रेयस आणि मंथनचा प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट आहे. या तिघांच्याही अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणली आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांना देखील या तिघांचा अभिनय नक्कीच आवडेल.”

World Theatre Day 2025: जागतिक रंगभूमी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व!

निर्माते राजेश मापुस्कर म्हणाले, “रोहन मापुस्कर हे इंडस्ट्रीतील कास्टिंग डिरेक्टर म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटात कोण झळकणार याची उत्सुकता मलाही खूप होती. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, तारुण्याच्या आठवणींना उजाळा देणारा असल्याने चित्रपटातील कलाकारांची योग्य निवड होणे, हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यानुसार ही निवड झाली आहे. मुलांची निवड झाल्यानंतर त्यांचे तीन महिन्यांचे वर्कशॉप घेण्यात आले. आता लवकरच प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तो सर्वांनी एकत्र पाहावा असा आहे.’’

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: These actors will be seen in rohan mapuskar marathi film april may 99

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
1

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
2

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO
4

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी वास्तूचे करा ‘हे’ उपाय, वर्षभर भासणार नाही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता

Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी वास्तूचे करा ‘हे’ उपाय, वर्षभर भासणार नाही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.