Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्य घटनेवर आधारित ‘शातिर The Beginning’ मराठी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर लाँच!

'तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल' असा गुन्हेगाराला इशारा देणारा ॲक्शन मराठी चित्रपट 'शातिर The Beginning' 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटाचे स्टारकास्ट देखील जबरदस्त आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 15, 2025 | 10:49 AM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अश्यातच आता प्रेक्षकांच्या भेटीस मराठी ॲक्शन चित्रपट लवकरच येणार आहे ज्याचे नाव ‘शातिर The Beginning’ आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट ‘…तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा आहे. ‘शातिर The Beginning’ या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. शातिर The Beginning हा मराठी येत्या 23 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित ‘शातिर The Beginning’ या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणींची सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ लवकरच होणार प्रदर्शित

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, ‘शातिर The Beginning’ माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली  पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटातील ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. ॲक्शन पॅक्ड अशी नायिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते.

‘धतड तटड धिंगाणा…’,‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील ‘प्रमोशनल साँग’ प्रेक्षकांच्या भेटीला

शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सुमन, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात विशेष भूमिका पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे. सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन, सस्पेन्स थ्रिलर असलेला ‘शातिर The Beginning’ हा मराठी चित्रपट येत्या 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trailer launch of shatir the beginning new women centered suspense thriller marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
1

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
2

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
3

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
4

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.