Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’पुरस्कार मिळाल्यानंतर मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाला, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”

आपल्या कलाकृतींतून कायमच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 27, 2025 | 05:52 PM
अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’पुरस्कार मिळाल्यानंतर मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाला, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”

अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’पुरस्कार मिळाल्यानंतर मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाला, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”

Follow Us
Close
Follow Us:

‘धूम धडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘गंमत जंमत’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरा माझा नवसाचा’ सह अशा अनेक चित्रपटांतून अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन केले आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका त्यासोबतच काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. आपल्या कलाकृतींतून कायमच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आता या निमित्ताने अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

Pushpa 2: ‘पुष्पा २’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज; या प्लॅटफॉर्मवर चित्रपटासह चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज!

मिलिंद गवळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशोक सराफ यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले,

 

“पद्मश्री अशोक सराफ, हे ऐकायला किती छान वाटतं. आपल्या माणसाला ‘पद्मश्री’ मिळाला याचा किती आनंद वाटतो. आमच्या अशोक मामांना ‘पद्मश्री’मिळाला याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. अनेक वर्षांपासून अनेक चित्रपटांमध्ये मी अशोक मामांबरोबर काम केलं असल्यामुळे ही ‘पद्मश्री’ जी पदवी त्यांना देण्यात आली, त्या पदवीसाठी ते किती पात्र आहेत, हे मला माहिती आहे. त्यांना पद्मश्री मिळायलाच हवा होता, जो त्यांना मिळाला, मला खूपच आनंद झाला. मी अशोक मामा बरोबर काम करायला सुरुवात केली, त्याच्या २५ वर्ष किंवा ३० वर्ष आधीपासूनच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती, मी त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट “सुन लाडकी सासरची” केला तेव्हाच ते सुपरस्टार होते, त्यानंतर पुढे सात सिनेमांमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायचा योग आला, आणि त्यांच्या बरोबर काम करण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मी त्यांच्याकडून खूप शिकलो, त्यांचा एक उत्तम गुण म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे, अशोक मामांना मी सातत्याने त्यांच्या कामाविषयी आस्था , त्यांच्या भूमिका वरचा त्यांचा पूर्वभ्यास, वक्तशीरपणा, आणि भरभरून टॅलेंट, हे मी सातत्याने पहात आलोय, आमच्या सिनेमांमध्ये इतरही दिग्गज अनुभवी मोठे कलाकार असायचे, पण त्यांच्यातलं वर्षानुवर्ष काम करून कामाविषयी पॅशन निघून गेल्याचं जाणवायचं, आणि एका बाजूला अशोक मामा 35-40 वर्ष सातत्याने काम करून सुद्धा कामाविषयीची त्यांची आस्था आणि त्यांचं नवोदित कलाकारास सारखं पॅशन आणि एनर्जी बघून अचंबित व्हायला व्हायचं. एखाद्या दिग्दर्शकाचं किंवा एखाद्या कलाकारचं कॅज्युअल अप्रोच बघून अशोक मामांचा संताप व्हायचा, त्या कारणासाठी मी त्यांची बरेच वेळा चिडचिड सुद्धा पाहिली आहे, त्यांचं म्हणणं असायचं की जर प्रामाणिक सिनेमा करायचा नसेल, तर मग करताच कशाला सिनेमा, का माझा आणि सगळ्यांचा वेळ फुकट घालवताय, आणि प्रेक्षकांच्या पण डोक्याला का ताप देताय, सिनेमा करायचा असेल तर तो प्रामाणिकच केला पाहिजे, असं त्यांचं सतत म्हणणं असायचं. खरंच म्हणूनच ते एक वेगळे कलाकार आहेत, आणि कदाचित म्हणूनच इतक्या वर्षानंतर त्यांच्या या प्रामाणिक कामाचं कौतुक म्हणून त्यांना पद्मश्री देण्यात आलय, आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की पद्मश्री अशोकराव सराफ यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. अशोक मामा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न; ‘या’ चित्रपट आणि नाटकांनी मारली बाजी…

गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दुर असलेले अशोक मामा सध्या, सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते.

Web Title: Milind gawali shares special post for ashok saraf after conferred with padma shri shares experience of working with him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • ashok saraf
  • marathi actor
  • padmashri award

संबंधित बातम्या

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
1

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
2

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
3

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच
4

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.