अशोक सराफ, नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसमुख चेहरा, धमाल विनोद, गावरान माणुसकीनं ओतप्रोत भरलेला कलाकार आणि आता त्यांच्या नावापुढे "पद्मश्री अशोक सराफ" अशी खास ओळख लागली.
आपल्या कलाकृतींतून कायमच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.