Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर थंडीत आणि बर्फात पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय मिलिंद सोमणची फिटनेस तरुणांनाही देतेय टक्कर

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायमच आपल्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या हेल्थमुळे चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चेत राहिला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 21, 2025 | 02:43 PM
भर थंडीत आणि बर्फात पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय मिलिंद सोमणची फिटनेस तरुणांनाही देतेय टक्कर

भर थंडीत आणि बर्फात पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय मिलिंद सोमणची फिटनेस तरुणांनाही देतेय टक्कर

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायमच आपल्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या हेल्थमुळे चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चेत राहिला आहे. शिवाय तो, डाएट आणि नियमित व्यायामही करत असतो. अनेकदा मिलिंद आपल्या इन्स्टाग्रामवर जिममधील किंवा रनिंग करत असतानाचे काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतो. अशातच अभिनेता मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्फाच्छादित प्रदेशामध्ये पुशअप्स करताना दिसत आहे. ऐन बर्फामध्ये अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा हा पुशअप्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होतोय.

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन…

मिलिंदचा एक नवीन व्हिडिओ सध्या सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. व्हिडिओमध्ये मिलिंद बर्फाच्छादित प्रदेशात टी-शर्टशिवाय पुशअप्स करताना दिसत आहे. मिलिंद सोमणच्या फिटनेसच्यासमोर २५ वर्षाचे तरुणही फिके पडतील, अशी त्याची फिटनेस आहे. ५९ वर्षांचा मिलिंद सोमण एक हेल्दी लाइफस्टाइल जगतो, तो कायमच फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतो. आपल्याला सदृढ आरोग्य मिळावे यासाठी अभिनेता जिममध्ये न जाता स्वतःहून कठोर परिश्रम करतो. मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मिलिंद सोमण सध्या नॉर्वेमधील ट्रॉस्मो येथे आहेत. तिथे सकाळी लवकर उठून त्यांनी पुशअप्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘डाकू महाराज’मधील एका गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने घेतले कोट्यवधी रुपये, मानधन ऐकून व्हाल चकित!

शेअर केलेल्या व्हिडिओतील मिलिंदची स्टाईल आणि लूक पाहून फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी त्यांच्या या व्हिडिओचे वर्णन प्रेरणादायी असे केले आहे. ‘तुमच्या फिटनेसचं कौतुक करावं तितकं कमी आहे.’, ‘इतक्या थंड वातावरणात तुम्ही तिकडे पुशअप्स मारत आहेत, इथे आम्हाला थंडी वाजतेय.’, ‘तुम्ही सध्याच्या तरुणपिढीसाठी इन्स्पिरेशन आहे.’ तर काहींनी त्यांच्याकडून हेल्थ टिप्सही मागितल्या आहेत. आपल्या फिटनेसमुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या मिलिंद सोमण यांचा वयाच्या ५९ वर्षीही फिटनेस कमालीचा आहे. त्यांचा फिटनेस फंडा ते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मिलिंद सोमण त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. पहिलं लग्न मोडल्यानंतर २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिलेला इतिहास रंगभूमीवर…’रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

Web Title: Milind somans fitness routine cant do without pushups even on a snowy day in norway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Bollywood

संबंधित बातम्या

तब्बल 7790 कोटींची मालकीण! Bollywood च्या ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका; कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर
1

तब्बल 7790 कोटींची मालकीण! Bollywood च्या ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका; कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.