
Avantika Malik on Divorce ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Avantika Malik on Divorce: बॉलिवूडचा चॉकलेट हिरो इमरान खान बराच काळ पडद्यापासून लांब आहे, पण तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो बातम्यांमध्ये आहे. मुंबई पोलिसांनी त्याला देश सोडून जाण्याची नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण आता थेट कोर्टात पोहोचलं आहे आणि लवकरच यावर सुनावणी होईल.पण याच दरम्यान त्याची माजी पत्नी अवंतिका मलिकने एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच एवढं स्पष्ट भाष्य केलं आहे, ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Imran Khan Ex-Wife Jemima Married:
इमरान आणि अवंतिका हे कॉलेजपासून एकत्र होते. दोघांची लव्ह स्टोरी खूप फेमस होती. जवळपास 18 वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते, त्यापैकी 8 वर्ष लग्नाचे होते. 2019 साली दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. तेव्हापासून लोक विचार करत होते की दोन इतक्या जवळच्या लोकांमध्ये असं काय झालं?
आता अवंतिकानेच सांगितलं आहे की, वेगळं होण्याचा पहिला विचार तिचा नव्हताच. ती एका पॉडकास्टमध्ये म्हणाली, “खरं सांगायचं तर मी कधीच घटस्फोटाचा विचार केला नव्हता. तो विचार इमरानचाच होता. त्यानेच मला येऊन सांगितलं होतं की आपण थोडं वेगळं राहून बघूया.”अवंतिका पुढे म्हणाली की, “आमच्यात वाद होते, प्रॉब्लेम्स होते हे मान्य आहे. पण प्रत्येक नात्यात होतात. मी ते सोडून जाण्याचा विचार कधीच केला नाही. इमरानने 6 महिने वेगळं राहण्याचा प्रस्ताव ठेवला. आम्ही 6 महिने वेगळं राहिलो आणि नंतर आम्हाला जाणवलं की आता एकत्र राहणं शक्य नाही. मग आम्ही दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर तिच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगताना अवंतिका खूप इमोशनल झाली होती. ती म्हणाली, “लोकांना वाटतं की घटस्फोट झाला म्हणजे सुटका झाली. पण नाही. तो अनुभव मृत्यूसारखा असतो.” “तुम्ही ज्या माणसासोबत अख्खं आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघितलंय, ते स्वप्नच मरून जातं. तुम्ही भविष्यात काय करणार, मुलं कशी वाढवणार, म्हातारपण कसं घालवणार याचं जे चित्र मनात रंगवलंय ते एका रात्रीत पुसलं जातं. माझ्यासाठी तो सगळ्यात जवळचा माणूस होता, तोच दूर गेला. त्याचं दुःख खूप मोठं होतं. मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. माझी मानसिक स्थिती खूप खराब झाली होती.
इतकं सगळं होऊनही अवंतिका त्या नात्याला फेल झालेलं नातं मानत नाही. ती म्हणते, “आम्ही 19 वर्षांपूर्वी आम्ही एकामेकांना भेटलो. त्याने यश बघितलं, अपयश बघितलं, मी त्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत होते. आम्ही एक मुलगी जन्माला घातली, एक कुटुंब बनवलं. 18 वर्ष आम्ही एकमेकांना प्रामाणिकपणे साथ दिली. शेवट चांगला झाला नाही याचं वाईट वाटतं, पण याचा अर्थ आमचं अख्खं नातंच वाया गेलं असं नाही. आम्ही प्रयत्न केले.”
तिला विचारण्यात आलं की तू जर 19 वर्षांच्या अवंतिकाला भेटलीस तर काय सल्ला देशील? यावर तिने जे उत्तर दिलं ते प्रत्येक मुलीने ऐकलं पाहिजे.”मी सांगेन की बाळा, आधी स्वतःसाठी काहीतरी कर. स्वतःच्या पायावर उभी राहा. स्वतःची ओळख बनव, करिअर बनव, पैसे कमव. लग्न, मुलं हे सगळं नंतर होतंच. आधी तू कोण आहेस हे जगाला दाखव. मी हीच चूक केली, मी खूप लवकर नात्यात अडकले आणि स्वतःकडे लक्षच दिलं नाही.
“सध्या तरी इमरान आणि अवंतिका दोघेही समजूतदारपणे वागत आहेत. दोघेही त्यांची मुलगी इमारासाठी चांगले आई-बाबा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. नवरा-बायकोचं नातं संपलं असलं तरी पालक म्हणून ते एकत्र आहेत.