सैफ अली खानच्या मेडिकल फॉर्मवर कुटुंबियांची सही नाही; सही करणारा 'तो' व्यक्ती कोण ? त्याने सही का केली ?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. नुकताच सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. त्या रिपोर्टमध्ये अभिनेत्याच्या पाठीवर पाच ठिकाणी चाकूने जखमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. सैफ अली खानला कोणी रुग्णालयात नेलं? याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. इब्राहिमने सैफला ऑटोने हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले गेले. त्यानंतर सैफ अली खान स्वत: तैमूरसोबत ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये गेल्याचे सांगण्यात आले.
आता हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानला त्याचा परममित्र अफसर झैदी याने लीलावती रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. खरंतर, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पहिल्यांदाच सैफचा मित्र अफसर झैदी याचे नाव माध्यमांसमोर आले आहे. सैफच्या रुग्णालयातील मेडिकल फॉर्मवर अफसर झैदी हे नाव पाहायला मिळतंय. आता प्रश्न असा आहे की, हा अफसर झैदी कोण आहे, ते जाणून घेऊयात.
हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार, सैफ अली खानवर १६ जानेवारीला मध्यरात्री अडीच वाजता हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या सैफ अली खानला कोणी रुग्णालयात नेलं, याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. काहींना इब्राहिम अली खानने नेल्याचा दावा केला, तर काहींनी आठ वर्षांच्या तैमूरने बाबाला रुग्णालयात नेल्याचं म्हटलं गेलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार सैफ आणि तैमूरसोबत आणखी एक व्यक्ती रुग्णालयात गेली होती. तर, त्या व्यक्तीचं नाव होतं, अफसर झैदी… अफसर ह्याने अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. लीलावती हॉस्पिटलच्या मेडिकल फॉर्मवर अफसरचं नाव होते.
अफसरने आता पुष्टी केली आहे की, हल्ल्याच्या रात्री तो हॉस्पिटलमध्ये गेला होता, पण तो सैफसोबत गेला नव्हता, त्याला सैफच्या कुटुंबियांनी फोन केल्यानंतर तो रुग्णालयात पोहोचला. सैफसोबत त्यावेळी तैमूर होता आणि तो फॉर्म भरण्यासाठी खूप लहान असल्यामुळे अफसरने त्या फॉर्मवर सही केली होती. हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार, अफसर झैदी हा सैफ अली खानचा चांगला मित्र आहे. लीलावती हॉस्पिटलच्या ॲडमिशन फॉर्मवर त्याची सही आहे. याचा अर्थ सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्याची सर्व औपचारिकता अभिनेत्याचा परममित्र झैदी यांने स्वत: पूर्ण केली. ही सर्व माहिती त्या MLC म्हणजेच मेडिको लीगल केस क्रमांक ५९ मध्ये नोंदवली आहे.
लीलावती हॉस्पिटलने हा एमएलसी फॉर्म वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार, पहाटे अडीच वाजता सैफवर हल्ला झाला असून अभिनेत्याला पहाटे 4.11 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अफसर झैदी हा सैफचा फार जुना मित्र आहे. अफसर झैदी हे बॉलिवूड जगतात नवीन नाव नाही. अफसर झैदीचे पूर्ण नाव अफसर अब्बास झैदी असं आहे. शिवाय, सैफ अफसरचा सोबतचा बिझनेस पार्टनरही आहे. अफसर सैफच्या कपड्याच्या ब्रँडचा सह-संस्थापक आहे. तसेच अफसर हा सैफच्या एक्सीड एंटरटेनमेंट या मनोरंजन मॅनेजमेंट कंपनीचा संस्थापक देखील आहे.
अफसरची सैफसह आणखी एका बॉलीवूड स्टारशी खूप चांगली मैत्री आहे, तो अभिनेता म्हणजे हृतिक रोशन होय. अफसर हा हृतिकच्या फिटनेस ब्रँडचा सह-संस्थापक आणि सीईओ आहे. अभिनेता हृतिक रोशनसोबत अफसर HRX नावाच्या ब्रँडचा सह-संस्थापकही आहे. HRX हा देशातील सर्वात मोठा होम फिटनेस ब्रँड आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर तसेच सह-संस्थापक आहे. २००५ मध्ये एक्सीड एंटरटेनमेंटच्या स्थापनेपासून अफसर झैदीचा भारतीय मनोरंजन विश्वातील प्रवास सुरू झाला असे म्हटले जाते. एक्सीड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अफसर झैदी यांनी हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सना विविध सेवा दिल्या आहेत.