'पोरी तुझा मुखडा' गाण्यात निक शिंदे आणि अंकिता मेस्त्रीचं बहरतंय प्रेम, नव्या रोमँटिक गाण्याची जोरदार चर्चा
सध्या सर्वत्र रोमँटिक गाण्यांची चलती आहे. अशातच ‘बिग हिट मीडिया’ नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला नवनवीन आणि आशयघन गाणी घेऊन येत असतो. या नव्या गाण्यांमध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली आहे. अर्थात हे गाणं आहे सर्वांचा लाडका निक शिंदेचं. आजवर निकची बरीच गाणी सुपरडुपर हिट झाली आहेत. निक आणि रोमँटिक गाणी हे समीकरणच बनलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच आता या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच निक ‘पोरी तुझा मुखडा’ हे नवं कोरं गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला घेऊन आला आहे.
‘स्त्री कशासाठी…?’, ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरून किन्नर आखाड्यात सुरू झाला राडा
प्रियकराची प्रेयसीला भेटण्यासाठीची हुरहूर, तिचा चेहरा नेमका कसा आहे?, ती कशी दिसते?,हे जाणून घेण्यासाठी भेटीची ओढ आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवताना प्रियकराची होणारी घालमेल या गाण्यातून रंजकपणे रेखाटण्यात आली आहे. निकच्या मनात अंकिताचा कोरलेला हा मुखडा त्यांचं नातं अधिक घट्ट करणार का?, हे या गाण्यातून पाहायला मिळतंय. या गाण्यात अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री अंकिता मेस्त्री या जोडीमध्ये बहरणार प्रेम पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यात एका स्पेशल पाहुण्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आणि हा स्पेशल पाहुणा म्हणजे सर्वांचा लाडका रील स्टार रितेश कांबळे. रितेशच्या विनोदी आणि हटके अभिनयाने या गाण्याची शोभा वाढविली आहे.
‘बिग हिट मीडिया’च्या या नव्याकोऱ्या गाण्याच्या निर्मितीची धुरा हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी सांभाळली आहे. तर संगीतकार म्हणून प्रशांत नकती आणि संकेत गुरव यांनी बाजू सांभाळली आहे. तर दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तर हे सुंदर असं गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. ‘बिग हिट मीडिया’च्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलेल्या निक शिंदेच्या या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अमिताभ बच्चन पुन्हा दिसणार एकत्र; करणार या आगामी प्रोजेक्टमध्ये काम!