House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणी FIR दाखल
उल्लू अॅप (Ullu App) वरील ‘हाउस अरेस्ट शो’ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘हाउस अरेस्ट शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि बिग बॉस फेम एजाज खानच्या विरोधात अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि एजाज खानच्या विरोधात मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखल केला आहे.
उल्लू अॅपवर स्ट्रीम करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये एजाज खान एका अभिनेत्रीला अश्लील दृश्य करण्यास प्रवृत्त करताना दिसत आहे. तो सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी एजाज खानविरुद्ध FIR दाखल केलाय. बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरियाँ यांनी मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यामध्ये तक्रा दाखल केली. एजाज खान, ‘हाउस अरेस्ट शो’चे निर्माते आणि उल्लू अॅप संबंधित काही व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.
थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल गोष्ट, “मंगलाष्टका रिटर्न्स” चा अफलातून टीझर लाँच
‘हाउस अरेस्ट शो’मध्ये असलेली अश्लील भाषा आणि शोमधील काही दृश्यांमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे, अशा तक्रारीच्या आधारे एजाज खानविरोधात हा FIR नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३ (५), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ६७ (अ) आणि कलम ४, ६ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम महिलांवर आधारित आहेत. “बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनेता एजाज खान, वेब शो ‘हाऊस अरेस्ट’चे निर्माते राजकुमार पांडे आणि उल्लू अॅपच्या इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.”, असे आंबोली पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
‘रेड २’ची बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई, ‘दृश्यम २’ आणि ‘तानाजी’चा रेकॉर्ड मोडत ठरला सुपरहिट
तक्रारीनुसार, वेब शोमध्ये अश्लील भाषा वापरली गेली आणि शोमध्ये केलेल्या गोष्टींमुळे महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला. “तक्रारदाराने सांगितले की, त्यांना शोमधील अश्लील कंटेंटबद्दल अनेक तक्रारी मिळाल्या होत्या आणि अनेक लोकांनी त्यांना त्याबद्दल तक्रार करणारे वैयक्तिक संदेश पाठवले होते,” असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले आहेत. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्सनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. त्यात एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोझ देण्यास सांगताना दिसतोय. मुंबई पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर एजाज खानसह निर्मात्यांवर आणि अॅपसंबंधित काही लोकांवर पुढची कोणती कारवाई होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले.