"लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर...", 'तारक मेहता का...' फेम बबिताचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
‘तारक मेहता का…’ मधील कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. मालिकेमध्ये बबिता जीची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्तला मालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ती प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करताना दिसते. मुनमुन सोशल मीडियावर कायमच राहण्याचा प्रयत्न करते. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं.
‘फियर द वॉकिंग डेड’ फेम Samuel French चे निधन; ‘या’ गंभीर आजाराने घेतला अभिनेत्याचा जीव!
वयाच्या ३७ वर्षी सुद्धा एखाद्या चिरतरुण अभिनेत्रीलाही फिकी पडणारी मुनमुन अजूनही सिंगलच आहे. तिने अजूनही लग्नाचा विचार केला नसल्याचा निर्णय मुलाखतीमध्ये सांगितला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी लग्न न करण्याच्या निर्णयामध्ये तिची आई सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं तिने मुलाखतीत सांगितलंय. मुनमुनने हल्लीच ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल दिलखुलास भाष्य केलं आहे. लग्न करण्याच्या निर्णयावर तिच्या आईने तिला काय सांगितलं आहे, हे तिने मुलाखतीमध्ये सांगितलं.
तुरुंगात Tory Lanez वर प्राणघातक हल्ला, १४ वेळा चाकूने वार; आता कशी आहे रॅपरची तब्येत?
‘ई-टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुनमुनने सांगितलं की, “माझ्या आईने केव्हाच माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला नाही. ती उलट मला नेहमी सांगत आलीये की, तू सर्वात आधी तुझ्या करियरवर आणि आयुष्यावर लक्ष दे. मी तरी तुला इतकंच सांगेल की, प्रवास कर, नवीन शिक आणि अनुभव घे. लग्न हा एक जीवनाचा भाग असू शकतो, संपूर्ण जीवनाचा नाही. त्यामुळे तू तुझ्या करियरवर व्यवस्थित लक्ष दे.” मुनमुनच्या मते, समाजामध्ये लग्नाविषयी अजूनही पारंपारिकच विचार प्रचलित आहेत. माझ्यापाठीशी माझी आई असल्यामुळे ती समाजातल्या लोकांना थेट उत्तर देते.
गंभीर अपघातानंतरही रुग्णालयात गाताना दिसला गायक; चाहते झाले भावुक, Viral Video
मुनमुन मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली की, “आईला जेव्हा गावाकडं माझ्या लग्नाबद्दल कोणीही विचारतं, तेव्हा आई त्यांना अभिमानाने सांगते की, माझ्या मुलीला सध्या लग्न करायचं नाही. मी तिच्या निर्णयाच्या संपूर्ण पाठीशी आहे. तिच्या ह्या वाक्यांनीच मला बळ मिळतं. करियरच्या सुरुवातीला मला खूप आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. कधी कधी फोटोशूटसाठी पैसे नसायचे तर कधी घर भाड्यासाठीही पैसे नसायचे. तेव्हा मला आई तिने साठवलेले पैसे द्यायचे. अनेकदा आई मला वडिलांना न सांगताच पैसे द्यायची. आज मी तिच्यामुळेच इतके पुढे जाऊ शकले. तिचा एका आधाराने माझं सर्व आयुष्य बदललंय.” असं मुलाखती दरम्यान मुनमुनने सांगितलं.