(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘इंडियन आयडल १२’ चा विजेता पवनदीप राजन नुकताच एका भीषण रस्ते अपघातात जखमी झाला होता, त्यानंतर त्याला नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात पवनदीप राजनला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि त्याची शस्त्रक्रिया सुमारे ६ तास चालली. पवनदीप राजन आता बरा होत आहेत आणि अजूनही रुग्णालयात आहेत. दरम्यान, पवनदीप राजनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पवनदीपचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि त्याच्या उत्साहाला सलाम करत आहेत.
रुग्णालयाच्या बेडवर बसून पवनदीपने गायले गाणे
अलीकडेच, पवनदीपच्या टीमने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी गायकाच्या प्रकृतीची माहिती दिली आणि लिहिले – ‘तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.’ आता काल रात्रीपासून पवनदीपचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, पवनदीप इमरान हाश्मीच्या ‘शंघाई’ चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘दुआ’ गाताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच ते त्याच्या धाडसीपणाला सलाम करत आहेत.
चाहत्यांनी व्यक्त केला आनंद
व्हिडिओवर कमेंट करत, वापरकर्ते गायकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘तुम्हाला असे पाहून मला खूप आनंद झाला.’ तर दुसऱ्याने लिहिले – ‘आता तू लवकर बरा हो.’ व्हिडिओमध्ये पवनदीप हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे आणि त्याच्या हातावर आणि पायांवर जखमांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.
५ मे रोजी घडला अपघात
इंडियन आयडल १२ चा विजेता पवनदीप राजन ५ मे रोजी एका रस्ते अपघाताचा बळी ठरला होता, ज्यामध्ये त्याला अनेक गंभीर दुखापती झाल्या होत्या. या अपघातात गायकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आणि चालकालाही गंभीर दुखापत झाली. अपघाताचे कारण चालकाला झोप लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पवनदीप आणि चालकाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
अनुराग कश्यपसाठी देवदूत ठरला ‘हा’ प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता, मुलगी आलियाच्या लग्नासाठीही नव्हते पैसे
पवनदीप राजन कोण आहे?
पवनदीप राजन हा उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे आईवडील आणि बहीण कुमाऊनी लोककलाकार आहेत. २०१५ मध्ये द व्हॉइस ऑफ इंडियामध्ये भाग घेतल्यावर पवनदीप प्रसिद्धीच्या झोतात आला. तो या शोचा विजेता ठरला आणि त्यानंतर त्याने इंडियन आयडॉल १२ चा किताब जिंकला. इंडियन आयडॉल १२ ट्रॉफीसोबत, पवनदीपने एक कार आणि २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देखील जिंकली. टॉप 5 मध्ये त्याची स्पर्धा मोहम्मद दानिश, अरुणिता कांजीलाल, निहाल तौर, सायली कांबळे आणि षण्मुख प्रिया यांच्याशी होती.