
फोटो सौजन्य - Social Media
बबिताजी यांना ओळखणाऱ्यांची, तसेच त्यांच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. पण बबिता कुणाची चाहती आहे? बबिताला कशी मुलं आवडतात? या सगळ्या गोष्टींची स्पष्टता स्वतः बबिताने दिली आहे. मुनमुन दत्ता उर्फ TMKOC फेम बबिता, तिने नुकतेच दिलेल्या मुलाखतीतील काही मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. हा मुद्दा म्हणजे मुनमुनचे लग्न आणि त्यानंतर होणारी मुलं? तर अशा खाजगी प्रश्नावर मुनमुन स्पष्टच व्यक्त झाल्याचे दिसून येत आहे.
मुनमुनने ही मुलाखत रणवीर अलाहबादीयाला दिली आहे. या चर्चेमध्ये सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे मुनमुन म्हणजेच बबिताचे लग्न! यावर उत्तर देताना बबिताने तिला लग्न करण्यामध्ये फार काही रस नसल्याचे सांगितले आहे पण तिने जर तिच्या नशीबात असेल तर होईल अशी ग्वाहीही दिली आहे. त्यामुळे ती लग्नाच्या मागे धावत नसल्याचे असे स्पष्ट तिने केले आहे. पुढे तिने तिला कशी मुलं आवडतात असा खाजगी प्रश्नाचेही उत्तर दिले आहे. मुनमुनचे म्हणणे आहे की तिला पैशाने श्रीमंत, दिसायला उत्कृष्ट, वागणुकीने समजूतदार आणि बोलण्यात पटाईचे असणारे शिलेदार तिला आवडत असे जाहीररीत्या स्पष्ट केले आहे. पण तिचे असेही म्हणणे आहे की एका व्यक्तीमध्ये इतके गुण असणारा व्यक्ती भेटणे ही तर तारेवरची कसरतच आहे.
मुनमुनचे मातृत्वाबद्दलचे विचार!
लग्न करण्यात रस नाही. श्रीमंत, देखणा, समजूतदार आणि बोलण्यात पटाईत असणारा मुलगा, अशा अटी! या सगळ्या मुद्द्यांनंतर तिने मातृत्वाबद्दलही तिचे मत मांडले आहे. मुनमुनचे म्हणणे आहे की तिला कधीही आई व्हायचे नाही आहे. तिला तिच्या निखळ त्वचेचे रहस्य विचारले असता मुलंबाळं नसणे आणि लग्न झालेले नसणे, ही दोन करणे तिने दिली. तेव्हा कुणी काहीही म्हणो पण मला मुलं नको आहेत असे तिने जाहीर स्पष्ट केले आहे. तसेच हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यावर हे तिचे मत असल्याचे स्पष्ट केले आहे.