dr rustam fame kurush debu
‘मुन्नाभाई MBBS’ (Munnabhai MBBS) हा चित्रपट आठवणार नाही, असा एकही माणूस सापडणार नाही. संजय दत्तचा (Sanjay Dutt) ‘मुन्नाभाई MBBS’ हा चित्रपट 2003 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाची आठवण आजही लोक काढतात. या चित्रपटातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या सिनेमातील डॉक्टर रुस्तम (Dr Rustam) हे सतत चिडचिड करणार पात्र कुरुश देबू यांनी साकारलं होतं. या कुरुश देबूंचा (Kurush Deboo) एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून डॉ. रुस्तमचं पात्र साकारणारा कुरुश देबू नक्की हेच आहेत का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा फोटो पाहून लोक खरंच बुचकळ्यात पडले आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर काही फोटो व्हायरल झाले आहेत.
कुरुश देबूंनी घटवलं वजन
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुश देबू यांचा सध्या व्हायरल झालेला हा फोटो खूप जुना आहे. मात्र तो सोशल मीडियावर काहींनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पिवळी पँट, पिवळा फ्लोरल शर्ट आणि पोल्का डॉट टाय आणि रेड ब्लेझर घातला आहे. या फोटोमध्ये डॉक्टर रुस्तम उर्फ कुरुश देबू आधीपेक्षा खूप वेगळे दिसत आहेत. आधीच्या तुलनेत त्यांचं वजन कमालीचं घटलेलं दिसत आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
[read_also content=”लसीकरण प्रक्रियेतील भेदभाव प्रकरण : सुरेश काकाणींना न्यायालयाचा दिलासा, प्रतिवादींना बजावली नोटीस https://www.navarashtra.com/maharashtra/court-relief-to-suresh-kakani-in-vaccination-case-nrsr-360403/”]
एका सोशल मीडिया युजरने विचारलं आहे की, “तुम्ही कुठे गायब झाला आहात ?” दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, मस्त सूट आहे आणि कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे. ” मुन्नाभाईशिवाय कुरुश देबू ‘हॅपी हस्बँड्स’, ‘फोर टू का वन’, ‘शीरीन फरहान की तो निकल पडी’, अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी काही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या फोटोची सध्या खूपच चर्चा सुरु आहे.