'हा' संगीत दिग्दर्शक आहे बिग बॉस मराठी फेम अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय
6 ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी सिझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडला. या सिझनमध्ये 6 फायनलिस्ट ठरलेल्या सदस्यांमध्ये अंकिता प्रभू वालावलकर हे नाव देखील सहभागी होते. बिग बॉस मराठी सिझन 5 चे पर्व सुरु झाल्यापासूनच अंकिताचे वैयक्तिक आयुष्य प्रचंड चर्चेत आले होते. याचं कारण म्हणजे तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय. कोकण हार्टेड गर्ल अशी अंकिताची ओळख आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय नक्की आहे तरी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली होती. आता अखेर अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयबद्दल एक पोस्ट समोर आली आहे.
हेदेखील वाचा- ‘क्या खूब लगती हो…’ अभिनेत्री भूमीने केला इंस्टावर राडा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ
खरं तरं, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणजेच तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय बद्दल सांगितलं होतं. पण त्या पोस्टमध्ये त्याचं नाव नव्हतं. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी कोकण हार्टेड बॉयने दिलेल्या शुभेच्छांबद्दल ही पोस्ट होती. त्यामुळे हा कोकण हार्टेड बॉय नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता. बिग बॉस मराठी फेम अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयचं नाव आहे कुणाल भगत. याबाबत अद्याप अंकिताने अधिकृतपणे काही सांगितलं नाही. परंतु अंकिता आणि कुणालच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
अंकिता आणि कुणाल यांनी एका म्युझिक व्हिडिओसाठीही एकत्र काम केले होते. ‘आनंदवारी’ या गाण्याला कुणाल-करण या जोडीने संगीत दिले असून, त्यामध्ये अंकिताने काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंकिताचं नाव ओंकार भोजनेसोबत जोडलं जात होतं. याबाबात अंकिताला विचारलं असता तिने या अफाव असल्याचं म्हटलं होतं.
हेदेखील वाचा- “बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून…” संकर्षण कऱ्हाडेची आईसाठी खास कविता
बिग बॉसच्या ग्रँड फिनाले नंतर एका युजरने अंकिताला प्रश्न विचारला होता की, तुझा घो (नवरा ) कोण आहे आता सांग ना… झालं आता बिग बॉस, मी खरंच जाणून घेण्यासाठी उत्साही आहे. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना अंकिताने 12 ऑक्टोबर असा रिप्लाय दिला. त्यामुळे 12 ऑक्टोबरला अंकिता तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयचा खुलासा करणार आहे. हे नाव कुणालच असेल की दुसऱ्या कोणाचं, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.
कुणाल एक संगीत दिग्दर्शक आहे. त्याचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रसिध्द झााले आहेत. त्याच्या इंस्टाग्रामवर फीडवर अंकितासोबतच एक फोटो शेअर करण्यात आला आहे. विश्वास ठेव, आपण हे भविष्यात रीक्रिएट करू. हा पुरस्कार जातो कुणाल भगतला, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिता आणि कुणालचं अभिनंदन केलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की, हाच आहे कोकण हार्टेड बॉय. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, पोरगा चांगलाय जोडी पण छान दिसतेय. तर अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.