बी टाऊनची सौंदर्याची खान आणि आपली मराठमोळी मुलगी भूमी पेडणेकर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आणले आहे. भूमीचा नवा फोटोशूट चाहत्यांच्या फार पसंतीस येत आहे. पोस्टखाली चाहत्यांच्या प्रतिसादाचा वर्षाव होत आहे. ऑक्टोबरच्या हिटमध्ये वातावरण आणखीन गरम करण्यासाठी भूमीचा हा प्रयत्न असल्याचे नेटकाऱ्याचे म्हणणे आहे.
भूमी पेडणेकरच्या फोटोशूटला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद. (फोटो सौजन्य - Social Media)
बॉलिवूडची मराठमोळी मुलगी भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर नुकताच तिचा क्लासिक लुक शेअर केला आहे.
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भूमीच्या अप्रतिम सौंदर्याला साजेशा असा प्रतिसाद चाहत्यांनी दिला आहे.
अभिनेत्रीने या फोटो शूटमध्ये भारतीय पोषाक परिधान केला आहे. साडीने तिच्या या सौंदर्याला चार चांद लावले आहेत.
अभिनेत्रीने या पोस्ट खाली 'Classic is always pretty' असा कॅप्शन दिला आहे. अनाविलाच्या आऊटफिटने आणि रोहन पिंगलायच्या छायाचित्रकारीने या सौंदर्याचा निखार आणखीन वाढवला आहे.
अभिनेत्रीच्या या पोस्टवर लाईक्स आणि कॉमेंटसचा वर्षाव होत आहे. एका नेटकऱ्याने तर 'क्या खूब लगती हो' गाण्याच्या बोलाची उपमा अभिनेत्रीला दिली आहे.