इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’मधून पदार्पण करणाऱ्या नर्गिस फाखरीने डेव्हिड धवन (मैं तेरा हिरो), शूजित सिरकार (मद्रास कॅफे) आणि रोहित धवन (डिशूम) यांसारख्या बॉलिवूडमधील काही दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आता या अभिनेत्रीने अजून एक इच्छा व्यक्त करून दाखवली आहे आणि ती म्हणजे तिला तिच्या आगमी प्रोजेक्ट साठी संदीप रेड्डी वंगा या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा आहे.
संदीप रेड्डी वंगा बद्दल बोलताना नर्गिस म्हणते ” मला ‘ॲनिमल’ मध्ये रणबीर कपूरचे पात्र ज्या पद्धतीने तयार केलं गेलं हे खूप आवडलं आहे. प्रत्येक सीन उत्तम शूट करून तो प्रेक्षकांना मोहित करणारा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
[read_also content=”प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा गुपचूप उरकला विवाह सोहळा https://www.navarashtra.com/movies/famous-comedian-munawwar-farooqui-secretly-got-married-for-the-second-time-539072.html”]
त्याच्या व्यतिरिक्त मला राजकुमार हिरानीचे ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘संजू’ सारखे चित्रपट भावले आहेत जे हलक्या-फुलक्या क्षणांनी भरलेले आहेत आणि त्यांचे चित्रपट ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे. शेवटी मला कबीर खान आणि ‘एक था टायगर’ सारख्या उच्च-ॲक्शन चित्रपटांबद्दलचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करायचं आहे”
नर्गिस ही अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट करून आपला दर्जा मिळवला आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिचे अनेक चाहते आहेत. नुकत्याच तिने केलेल्या या खुलाशामुळे नर्गिस फाखरीने तिच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढवली आहे. नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली असताना ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी तयारी करत आहे ज्याची ती या वर्षाच्या शेवटी घोषणा करेल.