मुंबई : आज नर्गिस दत्तचा स्मृतिदिन आहे. पद्मश्रीने सन्मानित होणारी नर्गिस ही पहिली अभिनेत्री आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी जवळपास 39 चित्रपटांमध्ये काम केले आहे. नर्गिसने वयाच्या 6 व्या वर्षी बालकलाकार म्हणून ‘तलाशे हक’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर नर्गिसने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी ती दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या तकदीर या चित्रपटात दिसली.
1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी बरसात, अंदाज, आवारा, दीदार, श्री 420, चोरी चोरी इत्यादी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. नर्गिस आणि राज कपूर यांनी 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. बॉलीवूडमध्ये त्यावेळी नर्गिसने आपल्या मदर इंडियामधील अभिनयाच्या बळावर हे सिद्ध केले की नायक नसलेला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरू शकतो.