Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natya Parishad Puraskar: नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘या’ नाटकाने पटकवला सर्वोत्कृष्ट नाटकाचा किताब

नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व नाट्य कलावंतांच्या सहकार्याने केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 15, 2025 | 06:26 PM
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर, 'या' ज्येष्ठ कलाकारांचा होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर, 'या' ज्येष्ठ कलाकारांचा होणार जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Follow Us
Close
Follow Us:

नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व नाट्य कलावंतांच्या सहकार्याने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नटराजाच्या सेवेसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. कै.गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनाप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळयात ते बोलत होते. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा सोहळा सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना शासनाच्या मदतीने सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करण्याचं आश्वासनही आशिष शेलार यांनी यावेळी दिले.

Kedarnath Helicopter Crash दुर्घटनेवर राहुल वैद्यने व्यक्त केला संताप, म्हणाला ‘मानवी जीवनाचे शून्य मूल्य…’

यावेळी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे तसेच इतर पदाधिकारी, नियामक मंडळ सदस्य व मराठी नाट्यसृष्टीतील मान्यवर कलावंत उपस्थित होते. ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र आणि रोख रक्कम रु.५१,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कारानंतर बोलताना ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्येष्ठ लेखक पु.ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व या दोघांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून मी ही संगीत नाट्यसेवा केली. त्याचे फलित म्हणजे आजचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा हा ‘जीवनगौरव पुरस्कार’. या पुरस्काराचा मी मनापासून स्वीकार करत सर्वांचे मनापासून आभार मानतो. संगीत नाटकाच्या विकासासाठी शासनाच्या सहकार्याची गरज ही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

‘सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ…’; संकर्षण कऱ्हाडेने ‘फादर्स डे’ निमित्त शेअर केली हृदयस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ

‘नाट्यसेवेत कार्यरत असताना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराची खुमारी काही औरच असते’ असं सांगताना,‘या वाटचालीत मिळालेले समाधान आणि भाग्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती नीना कुळकर्णी यांनी केले’. या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तसेच गुरु म्हणून लाभलेल्या प. सत्यदेव दुबे, विजया मेहता तसेच मार्गदर्शक ठरलेल्या विमलताई राऊत, डॉ. काशिनाथ घाणेकर, नाट्यसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि कुटुंबाचे आभार नीना कुळकर्णी यांनी यावेळी मानले. नाट्यसेवा हा आपला श्वास आहे तो न सोडण्याचा पती कै. दिलीप कुळकर्णी यांचा सल्ला हा जीवनगौरव पुरस्कार घेताना प्रकर्षाने आठवतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नाट्य परिषदेच्यावतीने लोककलावंतांना मदत, नाट्यसंस्थच्या प्रवासी बससाठी आरटीओ नियमावलीत बदल, नाट्यगृहांचं योग्य तो सांस्कृतिक व्यवस्थापन आदि मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांना यावेळी दिले.

‘Sardaar Ji 3’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, दिलजीत दोसांझने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे म्हणजेच नाट्यपरिषद करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील २० केंद्रावर दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी आणि अंतिम फेरी दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५,०००/- रुपये, तृतीय क्रमांकास ५०,०००/- उत्तेजनार्थ क्रमांकास २५,०००/- रुपये आणि इतर वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी केली.

या सोहळ्यात ‘गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी,पुणे निर्मित….गोविंदायन” कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रध्दा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर या कलाकारांचा सहभाग होता.

मराठी सेलिब्रिटी वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाले, “चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले तू…”

पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे

व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुळकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार- सुशांत शेलार, नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी महेश कापडोसकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी सागर मेहेत्रे, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी विक्रांत शिंदे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी संतोष लिंबोरे (पाटील), गुणी रंगमंच कामगार सतीश काळबांडे, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी अनिल पुरी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी मीनल कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी विजय नाट्य मंदिर, नाशिक, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी अजय कासुर्डे, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी डॉ. चंद्रकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टीचा जीव! ‘कंतारा २’ च्या सेटवर ३० क्रू मेंबर्ससह आणखी एक भयानक घटना

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (नाटक : ब्लँक्ड इक्वेशन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (नाटक : वेटलॉस) प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता) प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ), प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स)

नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक / प्रायोगिक नाट्य निर्मात्यांना आणि नाट्य व्यवस्थापकांना सहकार्य केल्याबद्दल दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकारी वृषाली शेट्ये यांना आणि ५१ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग, कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Nina kulkarni awarded lifetime achievement award by natay parishad urmilayan won the award for best play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
1

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
2

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
3

“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन
4

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.