marathi celebrity shared special post occasion of fathers day 2025
जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दरवर्षी ‘फादर्स डे’ सेलिब्रेट केला जातो. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी कविता किंवा पोस्ट शेअर करताना दिसत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं स्थान फार वेगळं आहे. बॉलिवूडसह मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या वडिलांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
आजच्या दिवशी मुलं आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात, आजच्या दिवशी त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यांनाच संधी असते. त्याचनिमित्त प्रत्येकजण आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. आता अशातच अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. मानसीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची आईदेखील आहे. या शेअर केलेल्या फोटोला मानसीने कॅप्शन दिले की, “बाबा, ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा. वडिलांचे अश्रू आणि भीती अदृश्य असतात. त्यांचे प्रेम अव्यक्त असते. पण, त्यांची काळजी आणि संरक्षण आयुष्यभर आपल्यासाठी बाळाचा आधारस्तंभ म्हणून राहते. एक वडील तुम्हाला सांगत नाहीत की ते तुमच्यावर प्रेम करतात, ते तुम्हाला दाखवतात.”
तर, अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने सुद्धा ‘फादर्स डे’निमित्त रितेशसाठी खास पोस्ट शेअर केली. रितेश- जेनिलियाने २०१२ साली लग्नगाठ बांधली. या कपलला दोन मुलं आहेत, जे अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट होताना दिसतात. जेनिलियाने रितेशसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, “प्रिय रितेश, तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उत्तम करतोस. तुझं काम असूदे किंवा बाबा म्हणून आपल्या मुलांची जबाबदारी घेणं… सगळ्या गोष्टीत तू परफेक्ट आहेस. विशेषतः मी म्हणेन… चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स तू मोडले आहेत. निःस्वार्थपणा, मुलांवर प्रचंड प्रेम करणारा, त्यांच्याशी मस्ती करणारा रियान अन् राहीलचा पर्सनल सुपरहिरो आहेस तू…! द बेस्ट बाबा एव्हर!” जेनिलियाने ही इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.
‘तुझ्याशिवाय…’, अंकिता लोखंडेला आली Sushant Singh Rajput ची आठवण; सुंदर फोटो शेअर करत म्हणाली…
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशालीने वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांच्या आठवणीमध्ये अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे की, “I am So Proud To Be Your Son… Love You Baba बाबा… तुझं नाव घेतलं की, एक वेगळीच ऊर्जा मिळते. तुझं अबोल प्रेम, तुझा आधार आणि तुझं कायमचं मागे उभं राहणं… हे सगळं शब्दांत सांगणं अशक्य आहे. आज फक्त तुझं नाही, तर प्रत्येक पावलागणिक तुझ्या आठवणींचंही सेलिब्रेशन आहे. Happy Father’s Day, बाबा… तूच माझा पहिला सुपरहिरो आहेस आणि कायम राहशील.”