मानलेल्या भावाच्या लग्नात नोरा फतेही झाली 'झिंगाट'; पाहा Video
कायमच आपल्या अदाकारीमुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी नोरा सध्या तिच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीची क्रेझ फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरात आहे. नोराने नुकताच दादर ते रत्नागिरी रेल्वेने प्रवास केला आहे. नोरा नुकतीच रत्नागिरीला तिच्या मानलेल्या भावाच्या लग्नाला गेली होती. हळदीमध्ये तिने सर्वांसोबत डान्स करत लक्ष वेधले आहे. आपल्या मानलेल्या भावाच्या हळदीमध्ये बेधुंद नाचताना आणि पाहुणचार स्वीकारतानाचा व्हिडिओ स्वत: नोराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला आहे. अभिनेत्रीचा हा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नोरा फतेहीचा मराठमोळा अंदाज, थेट रेल्वेनेच गाठलं रत्नागिरी; मानलेल्या भावाच्या हळदीत जिंकलं मन…
नोरा फतेही तिचा मानलेला भाऊ आणि तिचा पर्सनल फोटोग्राफर असलेल्या अनुप सुर्वेच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. गेल्या ८ वर्षांपासून तो तिच्यासोबत काम करतोय. आपल्या टीममधल्या एका माणसाच्या अभिनेत्री इतक्या खास पद्धतीने उपस्थित राहिल्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. आपल्या मानलेल्या भावाच्या हळदीमध्ये बेधुंद नाचताना आणि पाहुणचार स्वीकारतानाचा व्हिडिओ स्वत: नोराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला आहे. अभिनेत्रीचा हळदीमध्ये तुफान डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चक्क नोरा कोकणात गेल्यामुळे सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
तृषा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; शेवटचा फोटो केला शेअर
नोराच्या या ब्लॉगवर चाहत्यांनी तिचा मानलेला भाऊ आणि तिचा पर्सनल फोटोग्राफरच्या हळदीसाठी एवढा प्रवास करुन गेल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. अनेकांनी खरोखरच नोराला कोकणातली हळद या निमित्ताने अनुभवता आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, नोराने अनुपच्या हळदीत सगळ्या पाहुण्यांबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर बेभान डान्स करताना दिसली. इतकंच नाही तर अनुपच्या आईलाही तिने नाचवलं आहे. नोराने हळदीमध्ये ‘दिलबर’ गाण्यावरही डान्स केला होता. हळदीला उपस्थित असलेल्या छोट्या मुलांबरोबरही नोरा बरीच रमलेली आहे. त्यानंतर अनुपच्या घरच्यांनी हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली तर नोराने वरण भातावर ताव मारला. दुसऱ्या दिवशीही लग्नाला हजेरी लावत नवीन जोडप्याचं तिने अभिनंदन केलं आणि त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नोरा फतेही फक्त एक अभिनेत्री नसून ती एक प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. शिवाय, नोरा एक व्यक्ती म्हणूनही प्रचंड भारी व्यक्ती आहे. नोराने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर प्रवासादरम्यानचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. रेल्वेचा प्रवास आणि हळदीचा खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “माझ्या मानलेल्या भावाची म्हणजेच अनुपच्या हळदीच्या कार्यक्रमाचा रत्नागिरीतील हा छोटा व्लॉग! हळदीसाठी आम्ही ट्रेन पकडून रत्नागिरीला पोहचलो. इतका सुंदर अनुभव… अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये गेल्या ८ वर्षांपासून आहे. तो 2017 पासून माझा प्रवास कॅमेऱ्याच्या मागून कॅप्चर करत आहे, आता तो कॅमेरासमोर आहे. प्रत्येकवेळी तो माझ्यासाठी उभा राहिला आहे. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ. अनुप मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…”
नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दादर (Dadar) स्टेशन ते रत्नागिरी (Ratnagiri) असा प्रवास आणि हळद समांरभातील खास क्षण पाहायला मिळत आहेत. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. नोराने कोणताही बडेजाव न करता एका सामान्य व्यक्तीप्रमाणे हळदी समारंभाचा आनंद लुटला. अनुपच्या कुटुंबियांनी तिला पाहुणी म्हणून एक सुंदर गुलाबी रंगाची साडीही दिली. तिनेही आनंदात ती साडी स्वीकारली. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तिनं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. नोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.