फोटो सौजन्य - Social Media
कार्तिक आर्यनला सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मागणी आहे. तो यशाच्या शिखरावर पोहचला आहे. याचे कारण म्हणजे 2024 साली कार्तिकने ‘भूल भुलैया 3’ हा हिट चित्रपट दिला आहे. कार्तिकने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळेच त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्यातीलच एक धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटासाठी खूप जास्त फी घेत असल्याचे समजले आहे.
कार्तिकने त्याची फी वाढवली आहे
‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर कार्तिक आर्यनने त्याची फी वाढवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये फी घेत आहे. धर्मा प्रोडक्शनचे प्रसिद्ध अभिनेत्यांना एवढी फी देतात. या बातमीने चकित करून टाकले आहे. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीमधील अनेक हिट चित्रपट दिले आहे. आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजनदेखील केले आहे. आता याचदरम्यान अभिनेता यशाच्या पुढच्या पायरीवर आहे. अभिनेत्याने आगामी चित्रपटासाठी खूप जास्त फी घेण्याचे ठरवले आहे.
कार्तिकने दुजोरा दिलेला नाही
कार्तिक आर्यनने 50 कोटी रुपये फी घेतल्याच्या प्रकरणाला अद्याप दुजोरा दिलेला नाही. धर्मा प्रोडक्शनच्या करण जोहरनेही यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे हे कितपत खरे आहे हे अद्यापही समोर आलेले नाही आहे.
Bigg Boss 18 : सलमान खान दबंग मोडमध्ये, घेणार कशिश कपूरची शाळा! तर सारा खानला केलं घराबाहेर
यापूर्वीही चित्रपट करणार होते
कार्तिक आर्यनही काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या प्रोडक्शनसोबत ‘दोस्ताना 2’ हा चित्रपट करणार होता. मात्र परस्पर मतभेदांमुळे कार्तिकने करणचा हा चित्रपट केलेला नाही. आता दोघेही ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. समीर विद्वांस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तसेच या चित्रपटाबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे.
श्रीलाला कार्तिकची नायिका होणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा 2’मध्ये आयटम डान्स करणारी श्रीलाला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. श्रीलालाच्या नृत्याने प्रेक्षक प्रभावित झाले आहेत, आता अभिनेत्री बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले आहे. या दोघांची जोडी पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक झाले आहे.
VD 12: विजय देवराकोंडाचा ‘VD 12’ दोन भागात करणार रिलीज; निर्मात्यांचा चित्रपटसंबंधित मोठा खुलासा!
कार्तिकचा चित्रपट
अनीस बज्मी दिग्दर्शित, ‘भूल भुलैया 3’ ला त्याच्या विनोद आणि भयपटाच्या परिपूर्ण मिश्रणासाठी प्रशंसा मिळाली आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 417.51 कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स ऑफिस हलवून टाकले आहे. तसेच अभिनेत्याच्या या चित्रपटाने जबदस्त कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.