तृषा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन; शेवटचा फोटो केला शेअर
टॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री तृषा कृष्णनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाचे वृत्त चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. ख्रिसमसच्या सकाळी अभिनेत्री तृषा कृष्णनच्या मुलाचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना दु:खद बातमी सांगितल्यानंतर चाहत्यांनी तिच्या मुलाला अर्थात श्वानाला श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री त्रिशाचा मुलगा म्हणजेच तिचा पाळीव श्वान आहे. त्याचं नाव झोरो असून अभिनेत्रीने झोरोसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या पाळीव श्वानाचं निधन झालं आहे. त्रिशाने ख्रिसमसच्या सकाळीच झोरोच्या मृत्यूची बातमी शेअर केली. तिने झोरोच्या दफन करतानाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने झोरोच्या निधनाचे वृत्त सांगताना पोस्टला कॅप्शन दिले की, “माझा मुलगा झोरोने आज ख्रिसमसच्या दिवशी सकाळी आमचा निरोप घेतला. मला जवळून ओळखणारे लोकं समजू शकतात की माझे आयुष्य आता निरर्थक झाले आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटुंब सावरलेलो नाही. मी काही काळ कामातून ब्रेक घेत आहे.”
टॉलिवूड अभिनेत्री तृषा कृष्णनने आपल्या श्वानाच्या निधनानंतर कामातूनही ब्रेक घेतल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या श्वानाला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तृषा कृष्णन दु:खात बुडाली आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या कामाबद्दल बोलायचं तर, तिने अनेक वर्षांनी चित्रपटांत कमबॅक केले आहे. पण मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोनियिन सेल्वन’ सिनेमामुळे त्रिशा लाइमलाइटमध्ये आली. त्रिशा तामिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत काम करतेय. आगामी अनेक चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच त्रिशाने सोशल मीडियावर तिच्यासोबत आणि अजितच्या ‘वलीमाई’मधील अजितच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
Bigg Boss 18 : सलमान खान दबंग मोडमध्ये, घेणार कशिश कपूरची शाळा! तर सारा खानला केलं घराबाहेर