एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले 'हे' दोन चित्रपट ओटीटीवरही एकाच दिवशी रिलीज झाले, कुठे पाहता येणार ? वाचा
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न’ आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया ३’ एकाच दिवशी रिलीज झाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवरही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. जरीही एकाच दिवशी चित्रपट रिलीज होणार असले तरीही हे चित्रपट दोन्हीही वेगवेगळ्या ओटीटीवर रिलीज होणार आहेत. दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता ओटीटीवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घेऊया अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न’ आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया ३’ कोणकोणत्या ओटीटीवर रिलीज झाले आहेत.
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ओटीटीवर २७ डिसेंबरला अर्थात आज प्रीमियर होणार आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया 3’चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षाआधीच घरबसल्या पाहता येणार आहे. १५० कोटीचं बजेट असलेल्या चित्रपटाने भारतात २६०.०४ कोटींची कमाई तर, जगभरात ३८९.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे.
तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटही ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर २७ डिसेंबरला अर्थात आज रिलीज झाला आहे. चाहत्यांना हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहेत. कमाईच्या बाबतीत ‘भूल भुलैया 3’ ने रोहित शेट्टीच्या‘सिंघम अगेन’लाही मागे टाकलंय. ३५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतात २४२ कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरात ३८९,२८ कोटी रुपयांची कमाई केली.