Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंचायत’च्या दामादजीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…

ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील 'पंचायत' वेबसीरीज प्रसिद्ध वेबसीरीज आहे. सीरीजमधील एक कलाकार नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने लग्नबंधनात अडकत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 13, 2024 | 12:25 PM
'पंचायत'च्या दामादजीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…

'पंचायत'च्या दामादजीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीनंतर सर्वत्रच लग्नसराई सुरु होते. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच लग्नबंधनात अडकत आहेत. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत असताना एका सेलिब्रिटीच्या लग्नातले फोटो समोर आले आहेत. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील प्रसिद्ध वेबसीरीजपैकी एक म्हणून ‘पंचायत’ वेबसीरीजकडे पाहिले जाते. या सीरीजमधील एक कलाकार नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने लग्नबंधनात अडकत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत.

‘साबर बोंडा’ ठरला सनडान्‍स २०२५ मध्‍ये सामील होणारा भारतातील एकमेव चित्रपट!

त्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत लग्नबंधनात अडकणार असल्याची हिंट त्याने चाहत्यांना दिली होती. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीजमध्ये जावयाचा म्हणजेच, गणेशची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ खानने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडसोबत निकाह केला आहे. अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीचं झेबा असं आहे. असिफ आणि झेबा १० डिसेंबर २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

 

लग्नातले फोटो शेअर करताना आसिफ खान ह्याने “कुबूल है…” म्हणत पुढे लग्नाची तारीख लिहिली आहे. असिफ आपल्या गर्लफ्रेंडसोबत १० डिसेंबर २०२४ रोजी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नासाठी दोघांनीही स्पेशल पारंपारिक लूक केलेला होता. आसिफ आणि झेबा यांचा निकाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. आसिफने क्रीम कलरची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली होती. तर झेबाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये लग्नानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दोघांचेही रोमँटिक फोटोशूट सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहे.

Bigg Boss 18 ची टास्क क्वीन चुम दारंगवर प्रेक्षकांनी केला कौतुकाचा वर्षाव

फोटोंबद्दल सांगायचे तर, शेअर केलेल्या पहिल्या फोटोत आसिफ झेबाच्या कपाळावर किस करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत दोघंही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. आसिफने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र त्याचं नवीन प्रवासासाठी अभिनंदन करताना दिसत आहेत. शारिब हाश्मी, मौनी रॉय आणि इतर अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. आसिफ आणि झेबाला सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हेमा कुरेशी, फैझल मलिक यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आसिफ खानच्या कामाविषयी सांगायचं तर, ‘पंचायत’ वेबसीरीजमधून प्रकाशझोतात राहिलेला आसिफ शेवटचा रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्याबरोबर ‘काकुडा’ चित्रपटामध्ये दिसला होता. तो लवकरच राशिक खानच्या ‘सेक्शन 108’ मध्ये दिसणार आहे.

Web Title: Panchayat fame aasif khan marries his long time girlfriend zeba actor shares stunning picture from wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 12:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.