Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, नेमकं कारण काय?

अनंत नारायण दिग्दर्शित 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादावरून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 09, 2025 | 05:30 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या बॉलिवूड चित्रपटावरून सध्या वाद सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण करत असून चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज करतेय. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रतीक गांधी आणि पत्रलेखा आहे. हा बहुचर्चित चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण अचानक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादावरून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

“लग्नाआधी त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहा”, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला; कारण…

दरम्यान, पुण्यातील ब्राह्मण महासंघानं ‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. यामुळं सामाजिक तेढ वाढेल, असा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. तर त्यांच्या आक्षेपाला आणि आरोपांना चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटाचा प्रमुख हेतू दोन समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं आहे. त्यामुळे केवळ ट्रेलर पाहून तुम्ही याचा अंदाज घेऊ नका, तर संपूर्ण चित्रपट पाहा असा सल्ला दिग्दर्शकांनी आंदोलकांना दिला. याशिवाय, हिंदु महासंघानेही चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर चित्रपटाच्या ट्रेलरमधून वेगळं चित्र दाखवत जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi’ मालिकेतून स्मृती ईराणी यांचे कमबॅक ? एकता कपूरकडून शिक्कामोर्तब, उत्सुकता वाढली

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल..
चित्रपटाचे निर्माते रितेश कुडेचा यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं, “अनंत महादेव दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला नाही तर, २५ एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही आज सकाळीच घेतला आहे.” दरम्यान, ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केल्यामुळे या आठवड्यात थिएटरमध्ये सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा एकच हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसाआधी ‘फुले’च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. शिवाय चाहते निराश झाले आहेत.

Kesari 2: ‘केसरी २’ मधील अक्षय कुमारचा नवा लूक रिलीज, अभिनेता बनला ‘कथकली डान्सर’!

ट्रेलरमधील कोणत्या सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे ?

एका मुलाखतीमध्ये ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले की, ” आम्ही ‘फुले’ चित्रपटाचं मनापासून स्वागत करतो. अशा धाटणीचे चित्रपटाचे चित्रपट आवर्जून यायलाच हवेत. पण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर दगड आणि शेण फेकताना दिसतोय. हा सीन दाखवण्याला आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुले यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोकं, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोकं, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हा देखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे. शिवाय, चित्रपट एकतर्फी नको तो सर्वसमावेशक असावा असं मतही आनंद दवेंनी व्यक्त केले.

Web Title: Phule movie that was supposed to be released on april 11 has been delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • mahatma phule

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
4

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.