ब्रेकअपच्या चर्चा, मध्येच पॅचअप अन् खास फोटोशूट; तेजस्वी प्रकाश- करण कुंद्राच्या नात्यातला अनोखा ट्वीस्ट
सध्या ‘नागिन’फेम तेजस्वी प्रकाश तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती ‘बिग बॉस १५’ फेम अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनमध्ये आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या तेजस्वीला तिच्या आई- वडिलांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. तेजस्वी प्रकाशने तिच्या बॉयफ्रेंडच्या बाबतीत आई- वडिलांसोबत दिलखुलास चर्चा केली आहे. अभिनेत्रीने ही माहिती एका मुलाखतीत दिली आहे.
तेजस्वीने नुकतेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “माझ्या मागील ब्रेकअपपासून माझे आई- वडिल माझ्याबाबतीत खूपच प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी मला सांगितले की, तू करणसोबत लिव्ह इनमध्ये राहा. कारण मी किती चंचल आहे हे त्यांना माहित आहे. पण मी काही पूर्ण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नाही. माझ्या आई- वडिलांना माहित होतं की, गेल्या वेळी जे काही झालंय ते मीच केलं होतं. त्यांना वाटतं की, मी आणि करण लिव्ह इन मध्ये राहावं. आम्ही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करावा आणि भविष्यातली प्लॅनिंग एकमेकांच्या विचार विनिमयाने करावा.”
Kesari 2: ‘केसरी २’ मधील अक्षय कुमारचा नवा लूक रिलीज, अभिनेता बनला ‘कथकली डान्सर’!
मुलाखती दरम्यान तेजस्वी म्हणाली की, “मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत नाही. मी दुसऱ्या कोणत्या परराज्यातूनही देखील आलेली नाही. मी मुंबईकर आहे आणि मुंबई माझं घर आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्या घराजवळ शुट असतं, तेव्हा मी माझ्याच घरी राहते. जेव्हा केव्हा माझं काही काम असतं, त्यावेळीही मी माझ्याच घरी राहते. त्यासोबतच मला जेव्हा आराम करायचा असतो तेव्हा मी घरी निघून जाते. माझं घर गोरेगावला आहे, तर त्याचं घर बांद्राला आहे. जेव्हा माझं काम फिल्मसिटीमध्ये असतं. त्यावेळी मी माझ्या घरी राहते आणि जर इतर वेळी माझी शुटिंग जर बांद्राला असेल तर मी करणच्या घरी राहते.”
‘त्या पेक्षा मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणे पसंत करेल…’, कुणाल कामराने नाकारली बिग बॉसची ऑफर!
“आम्ही दोघंही आईवडिलांसोबतच एकमेकांच्या घरी राहतो. करण माझ्या घरी माझ्या आईवडिलांसोबत असतो आमि मी त्याच्या घरी त्याच्या पालकांसोबत असते. आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हे पाहून आमचे पालक खूश आहेत. माझ्या आईवडिलांनी तर थेटच सांगितलं की लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायला लागा. मलाही ते आवश्यक वाटतं. कारण लग्नाआधी सोबत राहिल्याने पार्टनरबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात.” मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये तेजस्वी म्हणाली की, “आम्ही एका रिॲलिटी शोच्या शुटिंग वेळी भेटलो होतो. दिवालीच्या सिक्वेन्सची शुटिंग आम्ही करत होतो. आम्ही एकमेकांसोबत डान्स केला आणि नंतर एकमेकांनाही दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. “