Smriti Irani Comeback On Tv With Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Season 2 Know What Ekta Kapoor Says
प्रसिद्ध बॉलिवूड निर्माती एकता कपूरचा फेमस शो म्हणून ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकेने स्वत:चा एक काळ गाजवला आहे. निर्माती एकता कपूरने मालिकेसह टिव्ही इंडस्ट्रीतही क्रांती घडवून आणली आहे, असं म्हटलं जातं. प्रेक्षकांना या मालिकेच्या कथानकात चढ- उतार आणि ट्वीस्ट पाहायला मिळाला आहे. या मालिकेतील कथानकाचे कामावर जाणाऱ्या महिला, गृहिणी, आजी आणि आजोबासह सर्वच कौतुक करायचे. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारही कमालीचे चर्चेत राहिले आहेत. मालिकेमध्ये अभिनेत्री आणि खासदार स्मृती ईराणी यांनी ‘तुळशी विराणी’ चे पात्र साकारले, त्यांनी साकारलेले पात्र घरोघरी प्रसिद्ध होते.
Kesari 2: ‘केसरी २’ मधील अक्षय कुमारचा नवा लूक रिलीज, अभिनेता बनला ‘कथकली डान्सर’!
ही मालिका तब्बल ८ वर्षे चालली. ८ वर्षे या मालिकेने सर्वाधिक टीआरपी मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाय या मालिकेने सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकेचाही रेकॉर्ड मोडित काढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेचा दुसरा सीझन येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता नवीन अपडेट आल्याची माहिती आहे. निर्मात्यांकडून या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एकता कपूरने तिचा सर्वाधिक काळ चाललेला शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’पुन्हा येणार असल्याचं मान्य केलं आहे. एकताने आपल्या मालिकेच्या दुसऱ्या सीझनवर काम सुरु असल्याची माहितीही चाहत्यांना दिली आहे.
‘त्या पेक्षा मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणे पसंत करेल…’, कुणाल कामराने नाकारली बिग बॉसची ऑफर!
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एकता कपूरच्या ह्या मालिकेचा दुसरा सीझन १५० भागांचा असेल, अशी माहितीही तिने स्वत: दिली आहे. यामागील कारण स्पष्ट करताना एकता म्हणाली की, “जेव्हा मूळ टीव्ही शो संपला, त्यावेळी २००० एपिसोड्सचा आकडा गाठण्यासाठी १५० एपिसोड्स शिल्लक होते. त्यामुळे या शोवरच्या आमच्या प्रेमानं सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आणून त्याचे १५० भाग पूर्ण केले आहेत. आणि २००० एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. हा या मालिकेचा हक्क आहे.” मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये तुलसीच्या भूमिकेत अभिनेत्री आणि खासदार स्मृती ईराणी दिसल्या होत्या. आता दुसऱ्या सीझनमध्येही मुख्य भूमिकेत त्याच दिसणार आहेत. फार मोठ्या ब्रेकनंतर स्मृती ईराणी अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमेरिकेत हृतिकच्या शोमध्ये संतापले चाहते, खराब व्यवस्थेमुळे अभिनेत्याला केले मदतीचे आवाहन!
दरम्यान, एकता कपूरने दिलेल्या माहितीनुसार, स्मृती ईराणी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण त्या नेमक्या कोणत्या भूमिकेत असतील याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आली नाहीये. याबद्दल बोलताना एकता कपूर म्हणाली की, या दुसऱ्या सीझनध्ये राजकारणही असणार आहे. आम्ही आता मालिकेतही राजकारण आणतोय. इतकंच नाही तर राजकीय व्यक्तीला आम्ही मालिकेत आणतोय.तिच्या या वक्तव्यावरून आता स्मृती इराणी या टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करू शकतात असं म्हटलं जातंय. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या निमित्ताने तिची निर्माती एकता कपूरशी गट्टी झाली. इतकी वर्ष उलटली, तरी या दोघींची मैत्री कायम आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, रिबूट मालिकेत मुख्य कलाकार अमर उपाध्याय ‘मिहिर विरानी’ आणि स्मृती इराणी ‘तुलसी विरानी’ म्हणून दिसतील. दरम्यान, एकता कपूरनं ‘मिहिर’ची भूमिका कोण साकारणार हे निश्चित केलेलं नाही. पण हाती आलेल्या माहितीनुसार, याबद्दल हितेन तेजवानी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉय यांच्याशी चर्चा सुरू आहे.