अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी (Planet Marathi) प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित ‘सुमी’ (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी ‘सुमी’ दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. ‘सुमी’ ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
‘सुमी’मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. ‘सुमी’ लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “’सुमी’ सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडणार असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Poster of 3 national award winning movie sumi to meet the audience nrps